शिखर धवन सर्वाधिक चौकारांचा मानकरी; सुरेश रैना दुसऱ्या, तर धोनी पंधराव्या क्रमांकावर

आयपीएलमधील चौकारांची गोष्ट येताच समोर येतो तो ‘गब्बर’ शिखर धवन. धवन सलामीवीर म्हणून ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 02:06 AM2020-03-22T02:06:05+5:302020-03-22T02:06:14+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan is the standard of most fours; Suresh Raina is second and Dhoni is the 15th | शिखर धवन सर्वाधिक चौकारांचा मानकरी; सुरेश रैना दुसऱ्या, तर धोनी पंधराव्या क्रमांकावर

शिखर धवन सर्वाधिक चौकारांचा मानकरी; सुरेश रैना दुसऱ्या, तर धोनी पंधराव्या क्रमांकावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये वेगवेगळ्या संघांतील खेळाडूंमध्ये नवनवीन विक्रम नोंदविण्याची स्पर्धा सुरू असते. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी फलंदाज मोठी खेळी करण्यावर भर देतात. टी-२० स्पर्धा जलद धावा करण्यासाठी ओळखली जाते. चौकार, षट्कारांची आतषबाजी पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर असतात.

आयपीएलमधील चौकारांची गोष्ट येताच समोर येतो तो ‘गब्बर’ शिखर धवन. धवन सलामीवीर म्हणून ओळखला जातो. आयपीएलमधील १२ सत्रांत त्याने वेगवेगळ्या संघांकडून कामगिरी केली आहे. धवनने आतापर्यंत १५९ सामने खेळले असून, यात ५२४ चौकार फटकावले आहेत. धवननंतर दुसरा क्रमांक सुरेश रैना याचा लागतो. रैनाने १९३ सामन्यात ४९३ चौकार मारले आहेत. तिसºया क्रमांकावर गौतम गंभीर असून, त्याने आयपीएलमध्ये खेळणे सोडले आहे.

चौथ्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली असून, त्याने ४८० चौकार मारले आहेत. आॅस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ४५८ चौकारांची नोंद आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षट्कार मारणारा व सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. भारताचा ‘फिनिशर’ म्हणून ओळखला गेलेला माही चौकार मारणाऱ्यांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंग धोनीने १९० सामन्यात २९७ चौकार फटकावले आहेत. (वृत्तसंस्था)

सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू
नाव सामने चौकार
शिखर धवन १५९ ५२४
सुरेश रैना १९३ ४९३
गौतम गंभीर १५४ ४९१
विराट कोहली १७७ ४८०
डेव्हिड वार्नर १२६ ४५८
रोहित शर्मा १८८ ४३१
अजिंक्य रहाणे १०४ ४०४
ख्रिस गेल १२५ ३६९
पार्थिव पटेल १३९ ३६५

Web Title: Shikhar Dhawan is the standard of most fours; Suresh Raina is second and Dhoni is the 15th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.