Join us  

IND vs SA ODI : Shikhar Dhawan भारतीय खेळाडूंना काय काय करायला लावतो? VVS Laxman कडून पोलखोल, Video Viral

India vs South Africa, 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:15 AM

Open in App

India vs South Africa, 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. भारताने १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर १२ वर्षांनी वन डे मालिका जिंकली. या मॅचनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यात कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) खेळाडूंना काय काय करायला लावतो, याची पोलखोल प्रभारी प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी केलीय.

Shikhar Dhawanचा हुमा कुरेशीच्या हातात हात घालून डान्स; दोघांचा रोमँटिक अंदाज, Photo Viral

प्रथम फलंदाजीला आलेल्या क्विंटन डी कॉक ( ६),  यानेमन मलान ( १५),  रिझा हेंड्रीक्स ( ९), एडन मार्कराम ( ९), डेव्हिड मिलर ( ७) आणि अँडिले फेहलुकवायो ( ५) हे अपयशी ठरले. मोहम्मद सिराज ( २-१७), वॉशिंग्टन सुंदर ( २-१५), कुलदीप यादव ( ४-१८) व शाहबाज अहमद ( २-३२) यांनी उत्तम गोलंदाजी करताना आफ्रिकेला ९९ धावांवर गुंडाळले. हेनरिच क्लासेनने ४२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा. कुलदीपने सलग दोन चेंडूंत बीजॉर्न फॉर्च्युन ( १) व  एनरिच नॉर्खिया ( ०) यांना बाद केले. लुंगी एनगिडीने भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक पूर्ण होऊ दिली नाही.  यापूर्वी १९९९ मध्ये नैरोबी येथे झालेल्या वन डेत त्यांना ११७ धावा करता आल्या होत्या. 

शिखर धवन ( ८), इशान किशन ( १०) हे लगेच माघारी परतले.  शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांनी चांगला खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. शुबमन ४९ धावांवर बाद झाला. भारताने १९.१ षटकांत ३ बाद १०५ धावा करून मोठा विजय मिळवला. श्रेयस २८ धावांवर नाबाद राहिला. भारताचा २०२२ कॅलेंडर वर्षातील हा ३८ वा विजय ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या ( २००३) विक्रमाशी भारताने बरोबरी केली. भारताने २०२२ या कॅलेंडर वर्षात २ कसोटी, १३ वन डे व २३ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये भारताने ३७ विजय मिळवले होते.

मागील ५ वन डे मालिकेतील भारताची कामगिरी वि. वि. दक्षिण आफ्रिका २-१वि. वि. झिम्बाब्वे ३-०वि. वि. वेस्ट इंडिज ३-० वि. वि. इंग्लंड २-१वि. वि. वेस्ट इंडिज ३-०  

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर धवन आणि टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनी बोलो तारा रारा... या पंजाबी गाण्यावर डान्स केला. पण, या डान्सची रिअर्सल गब्बरने करून घेतली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनबीसीसीआय
Open in App