ir="ltr">Shimron Hetmyer Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करूनही राजस्थानच्या संघाने २० षटकात ५ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. सुरूवातीला धावगती चांगली नसलेल्या राजस्थानला कर्णधार
संजू सॅमसनच्या अर्धशतकाने पाया मजबूत करून दिला. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने आपला खाक्या दाखवत १३ चेंडूत नाबाद २७ धावा कुटल्या आणि संघाला १५० पार मजल मारून दिली.
KKR ने राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी दिली. देवदत्त पडिक्कल २ धावांतच बाद झाला. पाठोपाठ जोस बटलरदेखील २५ चेंडूत २२ धावांची खेळी करून माघारी परतला. पण संजू सॅमसनने फटकेबाजी केली. त्याने ४९ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. करूण नायर (१३) आणि रियान पराग (१९) या दोघांना मोठी धावसंख्या उभारणं जमलं नाही. पण शिमरॉन हेटमायरने फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने १३ चेंडूत २७ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. कोलकाता नाईट रायडर्स कडून टीम सौदीने सर्वाधिक २ बळी टिपले.
राजस्थान रॉयल्स:जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, किपर), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
कोलकाता नाइट रायडर्स: आरोन फिंच, सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कर्णधार), बाबा इंद्रजित (किपर), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी
Web Title: Shimron Hetmyer Sanju Samson shines after Jos Buttler fails Rajasthan Royals give 153 Runs Target to win Kolkata Knight Riders IPL 2022 KKR vs RR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.