Join us  

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal, IPL 2022 PBKS vs RR: राजस्थानचा हिट(मायर) शो! पंजाबच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत मिळवला विजय

हेटमायरने शेवटपर्यंत टिकून मारला विजयी फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 7:40 PM

Open in App

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal, IPL 2022 PBKS vs RR: पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात सहज विजय मिळवला. जॉनी बेअरस्टोचे दमदार अर्धशतक (५६) आणि जितेश शर्माची शानदार फटकेबाजी (३८*) यांच्या बळावर पंजाबने २० षटकांत राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर यशस्वी जैस्वालने सुरेख अर्धशतक झळकावत विजयाचा पाया घातला. तर शिमरॉन हेटमायरने (३१*) लौकिकाला साजेशी फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

--

सामन्यात टॉस जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी चांगली सुरूवात केली. भानुका राजपक्षेने २ चौकार व २ षटकार खेचत २७ धावा केल्या. तर मयंक अग्रवाल १५ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टोने अखेर फॉर्ममध्ये परतत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ४० चेंडूत ८ चौकार आणि एक षटकार खेचत ५६ धावा केल्या. त्याच्यानंतर जितेश शर्माने नाबाद राहत १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोननेदेखील १४ चेंडूत २२ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

१९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉस बटलरने दमदार सुरूवात केली. त्याने १६ चेंडूत ३० धावा केल्या. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या यशस्वी जैस्वालने संधीचं सोनं केलं. त्याने ९ चौकार आणि २ षटकारांच्या साथीने ४१ चेंडूत ६८ धावा कुटल्या. संजू सॅमसन वेगवान खेळी करत होता. पण १२ चेंडूत २३ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायरने दमदार फटकेबाजी केली. पडिक्कल ३२ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला, पण हेटमायरने शेवटपर्यंत खेळपट्टी सांभाळली. त्याने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सजोस बटलर
Open in App