भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका नव्या मुलाला ट्वेंटी-20 संघात पदार्पण करण्याची संधी दिली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात मुंबईच्या खेळाडूला स्थान देण्यात आले. या खेळाडूला लहानपणी त्याच्या वडिलांनी प्रॅक्टीस दिली. या खेळाडूला प्रत्येक दिवशी पाचशे चेंडूंची ते प्रॅक्टीस द्यायचे आणि तोच मुलगा आज टीम इंडियाकडून पदार्पण करणार आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून खेळणारा तो 82 वा खेळाडू ठरला आहे. आता जाणून घेऊया या खेळाडू कोण?
शिवम दुबे या सामन्यातून पदार्पण करणार आहेत. शिवम चार वर्षांचा असताना त्याच्यातील गुणवत्ता त्यांच्या घरातील एका नोकराने ओळखली. त्याने या खेळाडूच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलामध्ये चांगली गुणवत्ता आहे. त्यानंतर या खेळाडूंच्या वडिलांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यांनी त्याला प्रॅक्टीस द्यायला सुरुवात केली. शिवमने 16 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 48.19 च्या सरासरीनं 1012 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 43.85 च्या सरासरीनं 614 धावा आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 19 सामन्यांत 242 धावा केल्या आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारत रचणार इतिहास, आजचा सामना आहे खास!
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यावर हवा प्रदुषणाचे सावट आहे आणि सामना रद्दही होण्याची शक्यता आहे. पण, जर हा सामना झाला, तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी तो ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. आजच्या दिवसभरात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने झाले आणि भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा सामना होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 1000 वा सामना ठरणार आहे. फेब्रुवारी 2005मध्ये पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात आला होता आणि 14 वर्षांत क्रिकेटच्या या फॉरमॅटनं 1000 सामन्यांचा पल्ला गाठला आणि भारत व बांगलादेश यांना तो ऐतिहासिक सामना खेळण्याचा मान मिळणार आहे.
Web Title: Shivam Dube got his T20I cap from Ravi Shastri, He becomes the 82nd cricketer to represent India in T20 format
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.