Shoaib Akhtar: पाकिस्तानचा रावळपिंडी एक्स्प्रेस गोलंदाज शोएब अख्तर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सुरूवातीला तो भारतीय खेळाडूंवर टीका करण्याची भूमिका घेऊन बोलत असल्याने टीकेचा धनी झाला होता. त्यानंतर कोरोना काळात भारत आणि पाकिस्तान या संघात निधी गोळा करण्यासाठी क्रिकेट सामना खेळला जावा, असा प्रस्ताव त्याने ठेवला होता. त्याच्या या प्रस्तावाला पाकिस्तानच्या आजी माजी खेळाडूंनी नक्कीच पाठिंबा दर्शवला. पण भारतीयांनी मात्र या प्रस्तावात काहीही रस दाखवला नाही. त्यामुळे शोएबचा प्रस्ताव फुकट गेला. पण आता मात्र शोएब अख्तर एका व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
शोएब अख्तरला सध्या सदिच्छांची गरज आहे. शोएबला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर, शोएबने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना सदिच्छा आणि प्रार्थना करण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न रुग्णालयात शोएबच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या 11 वर्षांपासून तो गुडघ्याच्या समस्येशी झुंज देत होता. अखेर त्याने आता यावर कायमची उपाययोजना केल्याचे त्याने सांगितले आहे. शोएब म्हणाला की तो आणखी ४ ते ५ वर्षे खेळू शकला असता, पण नंतर तो व्हीलचेअरवर आला असता.
व्हिडिओ शेअर करून शोएबने सांगितले की, मी आणखी ४ ते ५ वर्षे खेळू शकलो असतो, परंतु मला माहित होते की मी असे केले तर मी व्हीलचेअरवर येईन. त्यामुळेच मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या ऑस्ट्रेलियात त्याच्यावर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली आहे त्या ठिकाणी तो निरीक्षणाखाली आहे आणि त्याला आशा आहे की ही त्याची शेवटची शस्त्रक्रिया असेल. खरे तर याआधीही त्याच्यावर गुडघ्याच्या 5 शस्त्रक्रिया झाल्या आहेत, असं तो म्हणाला.
शोएब अख्तरची कारकीर्द
शोएब अख्तरने 224 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने 444 विकेट घेतल्या. याशिवाय, डोपिंगच्या आरोपांपासून ते बॉल टॅम्परिंगपर्यंत असो किंवा क्रिकेट बोर्डाविरुद्ध कोर्टात लढा ते आपल्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत, शोएब अख्तर या सर्व वादात अडकला होता.
Web Title: Shoaib Akhtar admitted to hospital in Australia after Rawalpindi express undergone knee surgery
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.