Join us  

Shoaib Akhtar Biopic: शोएब अख्तरच्या आयुष्यावर चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार शोएबची भूमिका

Shoaib Akhtar Biopic: 'रावळपिंडी एक्सप्रेस' नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 7:22 PM

Open in App

Shoaib Akhtar Biopic: भारतानंतर आता पाकिस्तानातही खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक (Biopic) बनवणे सुरू झाले आहे. याची सुरुवात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) जीवनावर एक चित्रपटापासून होत आहे. या चित्रपटात गायक-अभिनेता उमर जसवाल (Umair Jaswal) शोएब अख्तरची भूमिका साकारणार असून, पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित होईल.

बुधवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून उमरने ही माहिती दिली. पोस्टरमध्ये तो शोएबची 14 क्रमांकाची जर्सी घातलेला दिसत आहे. या चित्रपटात तो शोएबची भूमिका साकारणार असल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटाचे नाव 'रावळपिंडी एक्सप्रेस' असे ठेवण्यात आले आहे. शोएब अख्तर याच नावाने ओळखला जातो. ही भूमिका साकारण्यासाठी उमर खूप उत्सुक आहे. तो म्हणाला, 'शोएबचे आयुष्य अनेकांसाठी प्रेरणा आहे. तो केवळ पाकिस्तानचाच नाही तर जगातला मोठा स्टार आहे.

या चित्रपटात शोएबच्या जन्मापासून 2002 पर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. उमर वेगवेगळ्या वयोगटातील शोएबसारखा दिसण्यासाठी स्वत:ला तयार करत आहे. तो क्रिकेटचे प्रशिक्षणही घेत आहे. चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. तसेच, पाकिस्तानसह दुबई, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये याचे शूटिंग होईल. 

हा चित्रपट पुढील वर्षी 16 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. शोएब अख्तरने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असून, तो आता समालोचक म्हणून काम करतो. सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आजही शोएबच्या नावावर आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना जखमी केले आहे.

टॅग्स :पाकिस्तानशोएब अख्तरऑफ द फिल्डबॉलिवूडआंतरराष्ट्रीय
Open in App