Join us  

... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजाराहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाची पाकिस्तानसाठी 3000 धावा करणाऱ्या फलंदाजाची तुलना...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:13 AM

Open in App

भारताचा स्फोटक फलंदाज म्हणून वीरेंद्र सेहवाग आजही ओळखला जातो. फुटवर्क, स्टान्स याची फार परवा न करता आलेला चेंडू सीमापार पाठवायचा, हाच एक मंत्र जोपासून सेहवागनं कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. त्याच्या फटकेबाजीनं भल्याभल्या गोलंदाजांची पळताभुई करून सोडली. त्यामुळे त्याच्यासारखा फलंदाज होणे नाही. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याचं काही वेगळंच मत आहे. पाकिस्तानमध्ये सेहवागपेक्षा स्फोटक फलंदाज तयार झाला असता, असा दावा त्यानं केला. पाकिस्तानचा माजी फलंदाज इम्रान नाझीर हा सेहवागपेक्षा अधिक प्रतिभाशाली असल्याचा दावा रावळपिंडी एक्स्प्रेसनं केला आहे. 

सेहवागनं आपल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. भारताच्या दोन वर्ल्ड कप विजयात ( 2007 ट्वेंटी-20 आणइ 2011 वन डे) सेहवागचा सहभाग होता. सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17253 धावा केल्या आहेत, परंतु प्रतिभेचा विचार कराल तर पाकिस्तानचा नाझीर हा भारतीय फलंदाजापेक्षा सरस असल्याचा तर्क अख्तरनं लावला आहे. 1999मध्ये नाझीरनं पाकिस्तानकडून पदार्पण केले. हा फलंदाज जगभरात वर्चस्व गाजवेल, असा दावा त्यावेळी अनेक तज्ज्ञांना केला होता, परंतु नाझीरला अपेक्षांवर खरं उतरता आले नाही. 

नाझीरला केवळ 8 कसोटी, 79 वन डे आणि 25 ट्वेंटी-20 सामना खेळता आले. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 त्यानं अनुक्रमे 427, 1895 आणि 500 धावा केल्या. पण, नाझीरला संघ व्यवस्थापनाने योग्य मार्गदर्शन केले असते, तर तो सेहवागपेक्षाही सरस फलंदाज ठरला असता, असे मत अख्तरनं व्यक्त केले.

तो म्हणाला,''नाझीरचा योग्य मार्गदर्शन केले गेले नाही. ते झाले असते तर तो वीरेंद्र सेहवागपेक्षाही सरस फलंदाज ठरला असता. त्याच्याकडे स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता होती. त्याचा संघासाठी चांगला वापर करता आला असता, परंतु तसे झाले नाही.''

पाकिस्तान संघ व्यवस्थापनावर टीका करताना अख्तरनं पाकिस्तानचे दिग्गज जावेद मियाँदाद यांचे कौतुक केले. त्यांनी नाझीरला खूप मदत केली. ''जावेद मियाँदाद यांच्यामुळे नाझीर चांगली कामगिरी करू शकला. ते त्याला प्रोत्साहन देत होते. त्याची कामगिरी खराब झाली, तर जावेद त्याला मॅसेज पाठवून चुकीची जाणीव करून देत होते,''असे अख्तरने सांगितले.

टॅग्स :शोएब अख्तरविरेंद्र सेहवाग