Join us  

विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये पाकिस्तानच्या बाबरचा पत्ता कट; शोएब अख्तरनं ICCवर साधला निशाणा

icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 7:59 PM

Open in App

५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे. या बहुचर्चित स्पर्धेतील सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी क्रिकेट वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेआयसीसीच्या प्रोमोवरून टीका केली आहे. 

खरं तर आयसीसीने जारी केलेल्या प्रोमोमध्ये पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम नसल्याने अख्तरने नाराजी व्यक्त केली. आयसीसीवर टीका करताना त्याने म्हटले, "पाकिस्तान आणि बाबर आझम यांच्याशिवाय विश्वचषकाचा प्रोमो पूर्ण होईल असे ज्यांना वाटत आहे, त्यांनी एक विनोद सादर केला. त्यामुळे चला मित्रांनो, थोडे मोठे होण्याची वेळ आली आहे." एकूणच विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख न केल्याने अख्तरने टीका केली. या प्रोमोमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची झलक अनेकांचे लक्ष वेधणारी आहे.

१५ ऑक्टोबरला थरारआगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 

विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपशोएब अख्तरबाबर आजमशाहरुख खानआयसीसी
Open in App