नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवानंतर शोएब अख्तरनेपाकिस्तानी क्रिकेट संघावर सडकून टीका केली होती. मात्र नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यामुळे पाकिस्तानी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवताच शोएब अख्तरने मोठमोठी विधाने करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळविल्यानंतर शोएब अख्तरने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. पाकिस्तानने पाच गडी राखून विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून नेदरलॅंड्सच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. डच संघाने २० षटकांत ४ बाद १५८ एवढी धावसंख्या उभारली. डच संघाचा खेळाडू कॉलिन अकरमन याने २६ चेंडूत ४१ धावांची नाबाद ताबडतोब खेळी केली. अकरमनच्या ताबडतोब खेळीच्या जोरावर नेदरलॅंड्सच्या संघाने आफ्रिकेसमोर १५९ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. लक्षणीय बाब म्हणजे प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ बाद केवळ १४५ धावा करू शकला आणि नेदरलॅंड्सने शानदार विजय मिळवला.
भारत-पाकिस्तान फायनल होणार - अख्तर
पाकिस्तानला उपांत्य फेरीतून बाहेर करणाऱ्यांवर अख्तरने सडकून टीका केली. खरं तर या यादीत खुद्द अख्तरचाही समावेश आहे. अख्तरने व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले, सर्व संघांनी अप्रतिम क्रिकेट खेळले. बांगलादेशने देखील. नेदरलँड देखील. काही लोक म्हणत होते की पाकिस्तान बाहेर झाला आहे. बघा, उपांत्य फेरीत पोहोचलो आणि फायनलमध्ये पुन्हा भेटू शकतो. उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला नाही तर त्यांची गाठ अंतिम फेरीत होईल.
पाकिस्तानच्या मदतीला नेदरलॅंड्स आला धावून
दक्षिण आफ्रिकेचा पराभव केवळ पाकिस्तानसाठी आवश्यक नव्हता तर नेदरलँडसाठीही तो खूप महत्त्वाचा होता. कारण यानंतर हे कॉम्बिनेशन केले जात होते की जर पाकिस्तानने बांगलादेशला हरवले तर नेदरलँड्स पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर येईल. जे त्यांना पुढील टी-२० विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यासाठी मदतशीर असेल. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स सामन्यानंतर म्हणाला, "आणखी एक चांगला अनुभव आला, नेदरलँड्सच्या संघाने आणखी एक मोठी उलटफेर केली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर, आमच्यासाठी लक्ष्य हे होते की आम्ही अजूनही पुढील विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी खेळत आहोत. त्यामुळे दोन निकाल आमच्या बाजूने आले."
पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ केवळ १४५ धावा करू शकला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Web Title: Shoaib Akhtar has said that India and Pakistan could play the final of the 2022 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.