Shoaib Akhtar Picks His All-Time ODI XI : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं त्याच्या सर्वोत्तम वन डे एकादश संघ जाहीर केला. त्यानं निवडलेल्या ११ खेळाडूंमध्ये चार भारतीयांना संधी दिली आहे. वेस्ट इंडिजचे महान सलामीवीर गॉर्डन ग्रिनिज आणि भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्याकडे सलामीची जबाबदारी असेल. वन डे क्रिकेटमध्ये तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत आणि ग्रिनीज हे सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखले जातात.
Rashid Khan : बाबो... काय म्हणायचं या शॉटला?; सोशल मीडियावर राशिद खानचीच चर्चा, Video
तिसऱ्या क्रमांकासाठी अख्तरनं पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमान-उल-हक याला निवडले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अख्तरनं चौथ्या क्रमांकावर सईज अन्वरला ठेवले आहे. वन डे क्रिकेटमध्ये अन्वर पाकिस्तान संघासाठी सलामीला यायचा. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची निवड केली आहे, यासह अॅडम गिलख्रिस्ट हा आणखी एक यष्टिरक्षक-फलंदाज संघात आहे. गिलख्रिस्टला फलंदाज म्हणून अख्तरनं संघात निवडले आहे.
सातव्या क्रमांकावर युवराज सिंगची निवड केली आहे. २०११च्या वर्ल्ड कपमध्ये युवीनं ३६२ धावा आणि १५ विकेट्स घेत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. वासीम अक्रम, वकार युनिस आणि कपिल देव हे तीन जलदगती गोलंदाज अख्तरच्या संघात आहेत. फिरकीपटू म्हणून शेन वॉर्न संघात असून त्याच्याकडे नेतृत्वही सोपवले आहे.
शोएब अख्तरनं निवडलेला संघ - गॉर्डन ग्रिनीज, सचिन तेंडुलकर, इंझमान-उल-हक, सईद अन्वर, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), अॅडम गिख्रिस्ट, युवराज सिंग, वासीम अक्रम, वकार युनिस, कपिल देव, शेन वॉर्न ( कर्णधार). Shoaib Akhtar All-time ODI XI: Gordon Greenidge, Sachin Tendulkar, Inzamam-ul-Haq, Saeed Anwar, MS Dhoni (wk), Adam Gilchrist, Yuvraj Singh, Wasim Akram, Waqar Younis, Kapil Dev, Shane Warne (captain).