Shoaib Akhtar picks Pakistan players for IPL 2022 : २००८ चा अपवाद वगळला तर पाकिस्तानी खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये BCCI ने थारा दिला नाही. मुंबईवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलबंदी घातली गेली. आयपीएलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) पाकिस्तान सुपर लीग ( PSL) आणली. तरीही जगातील सर्वात यशस्वी लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा जीव तुटतोय... अशात यंदाच्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असते, तर ते कोणत्या संघाकडून खेळले असले, या प्रश्नावर माजी गोलंदाज शोएब अख्तर याने स्वप्नवत उत्तर दिले आहे.
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा क्वालिफायर १ व एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर २४ व २५ मे रोजी खेळवण्यात येणार आहे. २४ तारखेला गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) असा क्वालिफायर १ सामना होईल. २५ तारखेला लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. त्यानंतर २७ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ व २९ मे रोजी फायनल सामना खेळवला जाईल.
Sportskeedaशी बोलताना शोएब अख्तरने निवडलेले खेळाडू व आयपीएल फ्रँचायझी
- शोएब मलिक - लखनौ सुपर जायंट्स
- अझर अली - राजस्थान रॉयल्स
- आसीफ अली- कोलकाता नाईट रायडर्स
- मोहम्मद रिझवान - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- बाबर आजम - मुंबई इंडियन्स
- शाहिन शाह आफ्रिदी - दिल्ली कॅपिटल्स
तो म्हणाला, मोहम्मद रिझवान आयपीएलमध्ये खेळत असता, तर तो RCBचा सदस्य असता. तो विराट कोहलीसारखा स्टार खेळाडू आहे. त्याने विराटसह ओपनिंग केली असती.