Shoaib Akhtar, Rishabh Pant : रिषभ पंत ढोल्या! शोएब अख्तरची भारताच्या युवा खेळाडूवर टिप्पणी, कोट्यवधी कमावण्यासाठी दिली टिप्स 

Shoaib Akhtar, Rishabh Pant : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 8 वर्षांनंतर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मँचेस्टर येथील तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) ने अविश्वसनीय खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:08 PM2022-07-20T18:08:56+5:302022-07-20T18:09:29+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Akhtar, Rishabh Pant : India's market is big: Shoaib Akhtar explains how Rishabh Pant can emerge as a model and earn crores | Shoaib Akhtar, Rishabh Pant : रिषभ पंत ढोल्या! शोएब अख्तरची भारताच्या युवा खेळाडूवर टिप्पणी, कोट्यवधी कमावण्यासाठी दिली टिप्स 

Shoaib Akhtar, Rishabh Pant : रिषभ पंत ढोल्या! शोएब अख्तरची भारताच्या युवा खेळाडूवर टिप्पणी, कोट्यवधी कमावण्यासाठी दिली टिप्स 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shoaib Akhtar, Rishabh Pant : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 8 वर्षांनंतर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मँचेस्टर येथील तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) ने अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या नाबाद 125 धावांच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय क्रिकेटमधील भविष्याचा सुपर स्टार म्हणून रिषभकडे पाहिले जात आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्वही तो करतोय. त्यात महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून रिषभचेच नाव आघाडीवर आहे.  
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानेही रिषभचे कौतुक केले. पण, यावेळी त्याने भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाजाच्या वजनावरूनही टिप्पणी केली.

शोएबने त्याच्या यू ट्युब चॅनेलवर नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने रिषभ पंतला कोट्यवधी कमावण्याची टिप्सही दिली. रावळपिंडीच्या मते भारतीय बाजारात भविष्यात रिषभला अधिक भाव मिळणार आहे आणि तो एक मॉडेल म्हणून पुढे येऊ शकतो.  

शोएब अख्तर म्हणाला, तो थोडा जाडा आहे. तो त्याबाबत काळजी घेईल, अशी मला अपेक्षा आहे. कारण भारतीय मार्केट खूप मोठे आहे आणि तो दिसायलाही चांगला आहे. तो एक मॉडेल म्हणून पुढे येऊ शकतो आणि कोट्यवधी कमवू शकतो. भारतात जो व्यक्ति स्टार होतो, त्याच्यावर कोट्यवधींची गुंतवणूक केली जाते.

इंग्लंडमध्ये कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा रिषभ पंत हा पहिला आशियाई यष्टिरक्षक ठरला. वन डे क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर शतक झळकावणारा रिषभ पंत हा राहुल द्रविड व लोकेश राहुल यांच्यानंतर तिसरा यष्टिरक्षक ठरला. इंग्लंडमध्ये वन डे शतक झळकावणारा तो राहुल द्रविड ( १९९९) नंतर दुसरा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला होता. वन डे क्रिकेटमध्ये भारतीय यष्टिरक्षकाची नाबाद १२५ ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली आहे. रिषभने लोकेश राहुलचा २०२०चा न्यूझीलंडविरुद्धचा ११२ धावांचा विक्रम मोडला.  

Web Title: Shoaib Akhtar, Rishabh Pant : India's market is big: Shoaib Akhtar explains how Rishabh Pant can emerge as a model and earn crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.