खरचं सोनाली बेंद्रेसोबत अफेयर होतं का? शोएब अख्तरनं सांगितलं सत्य

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नातं कोणापासून लपून राहिलेले नाही. त्यामुळेच अनेकदा क्रिकेटपटूंची नावं बॉलिवूडमधील तारकांशी जोडले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:53 PM2019-06-19T12:53:23+5:302019-06-19T12:53:45+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Akhtar told the truth about sonali bendre affair | खरचं सोनाली बेंद्रेसोबत अफेयर होतं का? शोएब अख्तरनं सांगितलं सत्य

खरचं सोनाली बेंद्रेसोबत अफेयर होतं का? शोएब अख्तरनं सांगितलं सत्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नातं कोणापासून लपून राहिलेले नाही. त्यामुळेच अनेकदा क्रिकेटपटूंची नावं बॉलिवूडमधील तारकांशी जोडले गेले आहे. त्यात पाकिस्तानच्या खेळाडूंचेही नाव बॉलिवूडच्या अभिनेत्रींशी जोडण्यात आले आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे सोनाली बेंद्रे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि सोनाली यांच्यात अफेयर असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार सोनालीचे अपहरण करण्याचाही अख्तरनं प्लान केल्याच्या चर्चा होत्या. पण, अख्तरनं त्यावर आज खुलासा केला.

''सोनाली बेंद्रेसोबत अफेयरची चर्चा खोटी आहे. सोनालीला आजपर्यंत मी भेटलोच नाही,'' असं सांगून या चर्चांना पूर्णविराम लावला. यूट्यूबवर व्हिडीओद्वारे अख्तरने याबाबत खुलासा केला. तो पुढे म्हणाला की,'' मी सोनाली बेंद्रेचा फॅन नव्हतो. मी तिचे केवळ एक किंवा दोन चित्रपट पाहिले आहेत. आजारपणातील तिचा संघर्ष पाहिल्यानंतरच तिचा फॅन झालो.'' 

सर्फराज अहमद 'बिनडोक' कर्णधार; पराभवानंतर शोएब अख्तर संतापला
भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळवला. रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात  भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.  या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवानंतर माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर टीका केली. अख्तरनं सर्फराजला चक्क बिनडोक म्हटलं. 

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागूनही सर्फराजनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मतही अख्तरने व्यक्त केले. तो म्हणाला,''खेळपट्टी पूर्णपणे कोरडी होती. ती संपूर्ण वेळ झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यावर दव जमण्याची कोणतीच शक्यता नव्हती. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बिनडोकच घेऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं अशी चूक केली होती आणि आज पाकिस्ताननं त्याची पुनरावृत्ती केली.''

हा पाकिस्तानी क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेच्या प्रेमात झाला होता वेडा! किडनॅप करण्याचीही होती तयारी!
 

Web Title: Shoaib Akhtar told the truth about sonali bendre affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.