पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सतत वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहिला आहे. नुकतीच त्यानं पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या ( पीसीबी) कायदे विभागावर टीका केली आणि त्याला पीसीबीनं नोटिसही पाठवली आहे. पण, शोएब आपल्या वक्तव्यावर ठाम आहे आणि त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यात शोएबनं रविवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक बनायचे आहे. त्याच्यासारखे जलदगती गोलंदाज भारतात तयार करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
शोएब अख्तरनं रविवारी हॅलो अॅपवरून ही मुलाखत दिली. शोएबनं भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे कौतुक केले आणि त्याच्याकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमत आहे, असेही तो म्हणाला. हरभजन सिंग आणि युवराज सिंग हे जवळचे मित्र असल्याचेही तो म्हणाला. यावेळी शोएबनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्याबाबतही मत व्यक्त केलं. तो म्हणाला,''सचिन आणि सुनील गावस्कर हे महान खेळाडू आहेत. पण, सचिनपेक्षा राहुल द्रविडला बाद करणं अवघड होतं.''
तो म्हणाला,''भारतीय संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे सध्याचे सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहेत. संधी मिळाल्यास टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक बनायला मला आवडेल. माझ्यासारखे जलदगती गोलंदाज भारतात तयार करायचे आहेत.'' इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक बनायला आवडेल, असेही त्याने सांगितले.
यावेळी बायोपिकमध्ये कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यानं भूमिका करावी, असा प्रश्न शोएबला विचारण्यात आला. तो म्हणाला,''माझ्या बायोपिकमध्ये सलमान खाननं लीड रोल करावा.''
दरम्यान, पीसीबीच्या कायदे विभागावरील वक्तव्यावर शोएब म्हणाला,''पीसीबीचा कायदे विभाग भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. रिझवी त्यामधील एक आहेत. त्यांचा या भ्रष्टाचाराशी त्यांचा संबंध आहे आणि गेली 10-15 वर्ष ते पीसीबीसोबत काम करत आहे. माझ्या वकिलांनी त्या नोटिशीला उत्तर पाठवलं आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.''
हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना
भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट...