Join us  

PAK vs BAN: "जे इतर संघानी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केलं नाही ते पाकिस्ताननं करून दाखवलं"

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 4:58 PM

Open in App

सिडनी : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 185 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर आफ्रिकन फलंदाज चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला आहे.

तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान स्वस्तात माघारी परतले. मात्र मोहम्मद हारिसने 11 चेंडूत 28 धावांची ताबडतोब खेळी करून आफ्रिकन गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेरच्या काही षटकांमध्ये शादाब खानने 22 चेंडूत 52 तर इफ्तिखार अहमदने 35 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली. शादाब आणि इफ्तिखारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आफ्रिकेला 186 धावांचे तगडे आव्हान दिले. 

पाकिस्तान मजबूत स्थितीत दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्खियाने सर्वाधिक 4 बळी पटकावले तर वेन पार्नेल, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि तबरेझ शम्सी यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. खरं तर पावसाच्या व्यत्ययामुळे आता खेळ थांबवण्यात आला आहे. मात्र 9 षटकांपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 बाद 64 एवढी आहे. पाकिस्तानकडून शादाब खान आणि शाहिन शाह आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले आहेत. पाकिस्तानी संघाने केलेल्या आजच्या कामगिरीवरून संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने खेळाडूंची पाठ थोपाटली आहे. 

अख्तरने पाकिस्तानी संघाचे केले कौतुक पाकिस्तानी खेळाडूंची पाठ थोपटताना शोएब अख्तरने म्हटले, "आज आमच्या खेळाडूंची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. जेव्हा ते मला चुकीचे सिद्ध करतात तेव्हा मला ते आवडते. कोणत्या दिवशी पाकिस्तानी संघात बदल होईल माहिती नाही. गोलंदाजांनो, जा जिंकून या." याशिवाय इतर संघांना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध करता आले नाही ते पाकिस्तानने केले असल्याचे देखील अख्तरने म्हटले. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानशोएब अख्तरबाबर आजमद. आफ्रिका
Open in App