Join us  

अमिताभ बच्चन यांना दहशतवादी देशातून शुभेच्छा नकोत; नेटकऱ्याच्या ट्विटला शोएब अख्तरनं दिलं उत्तर!

अमिताभ यांच्यासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस'ची प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 1:15 PM

Open in App

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं पहिलं ट्विट केलं. त्यानं अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. पण, एका नेटकऱ्यानं पाकिस्तानी गोलंदाजाला सुनावलं आणि त्याच्या या ट्विटला रावळपिंडी एक्स्प्रेसनं सडेतोड उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

अमिताभ, अभिषेक बच्चन यांना झाला कोरोना; शाहिद आफ्रिदीनं केलं ट्विट, म्हणाला...

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना कोरोना झाल्याचे वृत्त शनिवारी रात्री येऊन धडकले. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधरावी यासाठी सोशल मीडियावर अनेकांनी प्रार्थना केली. अमिताभ व अभिषेक यांना Get well soonचे अनेक मॅसेज गेले.  अमिताभ आणि अभिषेक यांच्यानंतर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. 

बच्चन कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर यापैकी 28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 26 लोक हाय रिस्कवर होते. या सर्व 26 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि या सर्वांना पुढील 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबाचा स्टाफ कोरोना निगेटीव्ह आढळला आहे.

शोएब अख्तरनं ट्विट केलं की,''अमित जी लवकर बरे व्हा.. तुमच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो.'' त्याच्या या कृतीचे अऩेकांनी कौतुक केलं, परंतु एका नेटकऱ्यांनी अख्तरवर टीका केली. दहशतवादी देशातील कोणत्याही व्यक्तीकडून आम्हाला शुभेच्छा नकोत, असं त्यानं लिहिलं. त्याच्या या वक्तव्यावर अख्तरनं उत्तर दिलं की,''वरचा कधी कोणाचं ऐकंल हे सांगू शकत. तू लेबल लावल्यानं तसं लेबल तयार होणार नाही. देव तुला आर्शिर्वाद देवो.''

अन्य मह्त्त्वाच्या बातम्या

 

भारतीय फलंदाजाच्या घरी हलला पाळणा; झाला मुलीचा बाप! 

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून मोठी चूक; आयसीसी करणार कारवाई? 

विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

टॅग्स :शोएब अख्तरअमिताभ बच्चन