शोएब अख्तरचा  ' हा ' विक्रम 16 वर्षांपासून अबाधित

रावळपिंडी एक्सप्रेस, हे नाव घेतलं तर डोळ्यापुढे उभा राहतो तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. शोएबचा आज 43वा वाढदिवस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:05 PM2018-08-13T15:05:38+5:302018-08-13T15:06:38+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Akhtar's this' record has remained on his name from 16 years | शोएब अख्तरचा  ' हा ' विक्रम 16 वर्षांपासून अबाधित

शोएब अख्तरचा  ' हा ' विक्रम 16 वर्षांपासून अबाधित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशोएबने 2002 साली एक विक्रम केला होता, तो अजूनही अबाधित असल्याचेही समोर आले आहे.

नववी दिल्ली : रावळपिंडी एक्सप्रेस, हे नाव घेतलं तर डोळ्यापुढे उभा राहतो तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. शोएबचा आज 43वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडीत गोष्टींचा उहापोह काही जण करत आहेत. शोएबने 2002 साली एक विक्रम केला होता, तो अजूनही अबाधित असल्याचेही समोर आले आहे.

शोएबने हा विक्रम इंग्लंडविरुद्ध केला होता. या विक्रमामुळेच त्याचे नाव जगभरातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यापर्यंत पोहोचले होते. या विक्रमानंतर शोएबची फलंदाजांमध्ये दहशत निर्माण झाली होती. शोएबच्या तोफखान्याचा सामना करायचा कसा, याचा विचार त्यावेळी फलंदाज करत होते.

कोणता आहे  ' हा ' विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शोएबने हा विक्रम केला होता. शोएबने या सामन्यातील चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू जो टाकला तो त्याला सर्वात वेगवान गोलंदाज बनवून गेला. कारण हा चेंडू 161.30 प्रती कि.मी. वेगाने शोएबने टाकला होता. हा चेंडू क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान ठरला होता.

हा पाहा शोएबचा सर्वात वेगवान चेंडू


Web Title: Shoaib Akhtar's this' record has remained on his name from 16 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.