नववी दिल्ली : रावळपिंडी एक्सप्रेस, हे नाव घेतलं तर डोळ्यापुढे उभा राहतो तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. शोएबचा आज 43वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडीत गोष्टींचा उहापोह काही जण करत आहेत. शोएबने 2002 साली एक विक्रम केला होता, तो अजूनही अबाधित असल्याचेही समोर आले आहे.
शोएबने हा विक्रम इंग्लंडविरुद्ध केला होता. या विक्रमामुळेच त्याचे नाव जगभरातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यापर्यंत पोहोचले होते. या विक्रमानंतर शोएबची फलंदाजांमध्ये दहशत निर्माण झाली होती. शोएबच्या तोफखान्याचा सामना करायचा कसा, याचा विचार त्यावेळी फलंदाज करत होते.
कोणता आहे ' हा ' विक्रमइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शोएबने हा विक्रम केला होता. शोएबने या सामन्यातील चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू जो टाकला तो त्याला सर्वात वेगवान गोलंदाज बनवून गेला. कारण हा चेंडू 161.30 प्रती कि.मी. वेगाने शोएबने टाकला होता. हा चेंडू क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान ठरला होता.
हा पाहा शोएबचा सर्वात वेगवान चेंडू