Shoaib Malik Pakistan : शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, यावेळी तो चर्चेत येण्याचे कारण ना त्याचे तिसरे लग्न आहे ना त्याने केलेला कोणता विक्रम आहे. यावेळी, पाकिस्तान क्रिकेटचा हा दिग्गज खेळाडू बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये त्याने टाकलेल्या एका ओव्हरमुळे चर्चेत आहे. त्या ओव्हरमध्ये त्याने एकच चूक तीन वेळा केली, ज्यामुळे तो आता टीकेचा धनी ठरताना दिसत आहे. त्याने संपूर्ण सामन्यात केवळ एक षटक टाकले पण त्या षटकातही त्याने असे काही केले की आता त्याच्यावर चाहते थेट मॅच फिक्सिंगचा आरोप करताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे बांगलादेशच्या मैदानावर शोएब मलिकने काय केले हेदेखील लपून राहिलेले नाही. लग्नानंतर झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून मलिकने क्रिकेटच्या मैदानात आपले कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली. मात्र याच दरम्यान, त्याच्यावर एक गंभीर आरोप झाल्याचे दिसून आले आहे. शोएब मलिकने असे काय केले?
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये २२ जानेवारी रोजी फॉर्च्यून बरीशाल आणि खुलना टायगर्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात शोएब फॉर्च्युन बरीशालकडून खेळत होता. त्याने फक्त एकच षटक टाकले जे संपूर्ण सामन्यातील सर्वात महागडे षटकच ठरले. मलिकने या षटकात ३ नो बॉल टाकले आणि तब्बल १८ धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजीच्या प्रयत्नानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला गेला.
----
शोएब मलिकचे हे षटक फिक्स झाले होते, ज्यामध्ये त्याने एकही चेंडू नीट टाकला नाही आणि भरपूर धावा दिल्या, अशा चर्चा सोशल मीडियावरील रंगल्या. तसेच, काहींनी पाकिस्तानी खेळाडू आणि फिक्सिंग हे जुनं नातं आहे असं म्हणत त्यांनी हिणवले.
Web Title: Shoaib Malik bowled 3 no balls in over fans says its match fixing after marriage controversy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.