नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा खेळाडू शोएब मलिकने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक २०२२ साठी संघातून वगळण्यात आल्याने निराशा व्यक्त केली आहे. कर्णधार बाबर आझमची इच्छा असेल तरच खेळेन असे त्याने सांगितले. क्रिकेट पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने बाबर आझमशी अधूनमधून बोलणे होत असल्याचे म्हटले आहे.
शोएब मलिकने म्हटले, "बाबर आझमसोबत नक्कीच चर्चा झाली आहे. विश्वचषकात देखील अशी चर्चा झाली होती. बाबरने मला विचारले की तुला काय करायचे आहे. त्याने मला विचारले की तुला निवृत्ती घ्यायची आहे की आणखी खेळायचे आहे. तू काय विचार करत आहेस? म्हणून मी थेट बाबरला सांगितले की, मी निश्चितपणे त्यासाठी पात्र आहे की इतकी वर्षे खेळल्यानंतर किंवा इतर जे काही क्रिकेटपटू आहेत, ते जेव्हा अनेक वर्षे किंवा अगदी थोडे खेळतात, तेव्हा आमच्या क्रिकेट बोर्डाकडून (PCB) विचारणा केली पाहिजे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूला काय हवे आहे किंवा काय हवे आहे हे विचारायला हवे."
"म्हणून मी बाबरला सांगितले की हे बघ बाबर वातावरण किंवा पूर्वी माझ्यासोबत गोष्ट ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे मला आणखी नाही क्रिकेट खेळायचे. पण जर तुला माझे वैयक्तिक मत विचारायचे असेल तर माझ्या फिटनेसचे काय किंवा मी अधिक खेळू शकेन की मी संघावर ओझे तर होणार नाही ना. तू मला ओळखतोस, तुला माझा फिटनेस माहित आहे." असेही त्याने म्हटले.
बाबर आझमची इच्छा असेल तरच खेळेन
आणखी क्रिकेट खेळायचे आहे याबाबत शोएबने म्हटले, "हो, जर तुम्ही माझ्याशी करार केलात तर मला सांगा की मी नक्कीच उपलब्ध असेन. मी पाकिस्तानसाठी नेहमीच उपलब्ध होतो आणि अनेक गोष्टी विसरलो आहे. मी सांगितल्याप्रमाणे मी निवडक सामने किंवा काहीही खेळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला जरूर सांगा", अशा शब्दांत मलिकने बाबर आझमकडे पाकिस्तानी संघात पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
PCB वर साधला निशाणा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधताना शोएब मलिक म्हणाला, "मागील काही दिवसांत मी पाहिले आहे की, असे अनेक दिग्गज आहेत, असे अनेक क्रिकेटपटू आहेत, त्यांनी पाकिस्तानसाठी खूप काही केले आहे, पण पीसीबी त्यांच्याशी तसा व्यवहार करत नाही. त्यांना क्रिकेटमधून ज्या पद्धतीने निरोप दिला जात आहे, ते पात्र असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे होऊ नये." तसेच मोहम्मद हाफिज निवृत्त झाला आहे. आमच्याकडे पाकिस्तान सुपर लीगची स्पर्धा पार पडली. त्यामध्ये त्याला किमान एकतरी ट्रॉफी द्यायला हवी होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे आभार मानले पाहिजेत. क्रिकेटपटूला हेच हवे असते." असे शोएब मलिकने अधिक म्हटले.
Web Title: Shoaib Malik said that I will play cricket only if Babar Azam wants otherwise No will play
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.