Video : शोएब मलिकच्या गाडीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली घुसली गाडी

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक ( Shoaib Malik) याच्या गाडीचा रविवारी लाहोर येथे भीषण अपघात झाला

By स्वदेश घाणेकर | Published: January 11, 2021 07:02 AM2021-01-11T07:02:25+5:302021-01-11T07:02:52+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Malik suffers horrific crash as ex-Pakistan skipper's sports car rams into truck in Lahore, Video | Video : शोएब मलिकच्या गाडीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली घुसली गाडी

Video : शोएब मलिकच्या गाडीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली घुसली गाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक ( Shoaib Malik) याच्या गाडीचा रविवारी लाहोर येथे भीषण अपघात झाला. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या पती मलिक पाकिस्तान सुपर लीगच्या ( Pakistan Super League ) ड्राफ्टनंतर घरी परतत होता. त्यावेळी हा अपघात झाला. त्याची स्पोर्ट्स कार ट्रकच्या खालीच घुसली.  
पाकिस्तान सुपर लीगमध्ये मलिक पेशावर झाल्मी संघाकडून मागील पर्वात खेळला होता आणि ड्राफ्टमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो गेला होता. त्याच्या स्पोर्ट्स कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.  रविवारी लाहोर येथे हा अपघात झाला. येथील स्थानिक हॉटेलबाहेर ट्रक पार्क केला होता आणि मलिकचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटला व ती गाडी त्या ट्रकखाली घुसली.  

तेथील स्थानिक टीव्ही SAMAAच्या वृत्तानुसार मलिक हा वाहब रियाझच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. त्यावेळी गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यात गाडीच्या पुढचा भाग पूर्णपणे तुटला. सुदैवानं मलिकला काहीच झाले नाही.  




''मी पूर्णपणे बरा आहे,''असे मलिकनं ट्विट केलं. 

शोएब मलिक त्या गाडीत बसला होता, असे प्रत्यक्षदर्शीनं सांगितले. तो पुढे म्हणाला,' मी त्याचा व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानं मला तसं न करण्याची विनंती केली.'  

Web Title: Shoaib Malik suffers horrific crash as ex-Pakistan skipper's sports car rams into truck in Lahore, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.