आयपीएलमधीलराजस्थान रॉयल्स या संघातून खेळणाऱ्या खेळाडूचा गाडी चालवत असताना अपघात झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. हा खेळाडू स्वत: गाडी चालवत होता आणि त्यावेळीच त्याचा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएलचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. आयपीएल सुरु होण्यासाठी आता फक्त जवळपास एका महिन्याचा कालावधी बाकी आहे. आता जर अपघातामध्ये हा खेळाडू जखमी झाला तर तो सराव कधी आणि कसा करणार, याची चिंता राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाला आहे.
राजस्थानच्या संघात यंदा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये हा खेळाडू पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सकडून खेळत नसून यापूर्वीही खेळलेला आहे. आता हा खेळाडू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस.
रविवारी थॉमस हा गाडी चालवत होता. ओल्ड हार्बर येथे गाडी आल्यावर थॉमसच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात झाल्यावर थॉमसला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. थॉमसला किरकोळ दुखापत झाली असून तो लवकरच क्रिकेटच्या मैदानात उतरेल, असे त्याच्या व्यवस्थापकाने सांगितले आहे.
इंडियन प्रीमिअर लीग 2020चं प्रतिक्षेत असणारं अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर रंगणार आहे. 17 मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
असे आहे संपूर्ण वेळापत्रक- 29 मार्च, रविवारः मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. मुंबई30 मार्च, सोमवारः दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. दिल्ली31 मार्च, मंगळवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स- 8 वा. बंगळुरू1 एप्रिल, बुधवारः सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. हैदराबाद2 एप्रिल, गुरुवारः चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. चेन्नई3 एप्रिल, शुक्रवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. कोलकाता4 एप्रिल, शनिवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. मोहाली5 एप्रिल, रविवारः मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 4 वा. मुंबई5 एप्रिल, रविवारः राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. जयपूर/गुवाहाटी6 एप्रिल, सोमवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. कोलकाता7 एप्रिल, मंगळवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. बंगळुरू8 एप्रिल, बुधवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स- 8 वा. मोहाली9 एप्रिल, गुरुवारः राजस्थआन रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 8 वा. जयपूर/गुवाहाटी10 एप्रिल, शुक्रवारः दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. दिल्ली11 एप्रिल, शनिवारः चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. चेन्नई12 एप्रिल, रविवारः सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - 4 वा. हैदराबाद12 एप्रिल, रविवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. कोलकाता13 एप्रिल, सोमवारः दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. दिल्ली14 एप्रिल, मंगळवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. मोहाली 15 एप्रिल, बुधवारः मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. मुंबई16 एप्रिल, गुरुवारः सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स - 8 वा. हैदराबाद17 एप्रिल, शुक्रवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. मोहाली18 एप्रिल, शनिवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. बंगळुरू 19 एप्रिल, रविवारः दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 4 वा. दिल्ली19 एप्रिल, रविवारः चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. चेन्नई20 एप्रिल, सोमवारः मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. मुंबई21 एप्रिल, मंगळवारः राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. जयपूर22 एप्रिल, बुधवारः रॉयल चॅलेजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. बंगळुरू 23 एप्रिल, गुरुवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. कोलकाता24 एप्रिल, शुक्रवारः चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. चेन्नई25 एप्रिल, शनिवारः राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. जयपूर26 एप्रिल, रविवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट रायडर्स - 4 वा. मोहाली26 एप्रिल, रविवारः सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. हैदराबाद 27 एप्रिल, सोमवारः चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. चेन्नई28 एप्रिल, मंगळवारः मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 8 वा. मुंबई29 एप्रिल, बुधवारः राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. जयपूर30 एप्रिल, गुरुवारः सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. हैदराबाद1 मे शुक्रवारः मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. मुंबई2 मे शनिवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. कोलकाता3 मे रविवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 4 वा. बंगळुरू3 मे रविवारः दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. दिल्ली4 मे सोमवारः राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. जयपूर5 मे मंगळवारः सनरायझर्स हैरदाबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. हैदराबाद6 मे बुधवारः दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. दिल्ली7 मे गुरुवारः चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 8 वा. चेन्नई8 मे शुक्रवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. मोहाली9 मे शनिवारः मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. मुंबई10 मे रविवारः चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 4 वा. चेन्नई10 मे रविवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. कोलकाता11 मे सोमवारः राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. जयपूर12 मे मंगळवारः सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. हैदराबाद 13 मे बुधवारः दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. दिल्ली14 मे गुरुवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. बंगळुरू15 मे शुक्रवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. कोलकाता16 मे शनिवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. मोहाली17 मे रविवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. बंगळुरू