मुंबई : आतापर्यंत काही देशाचे खेळाडू मॅच फिक्सिंग करत असल्याचे आपण पाहिले आहे. पण इथे तर बांगलादेशचे क्रिकेट मंडळचं मॅच फिक्सिंग करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप बांगलादेश क्रिकेट समितीचे माजी अध्यक्ष हुसेन चौधरी यांनी केला आहे.
चौधरी म्हणाले की, " क्रिकेट जगतामध्ये बांगलादेशचे क्रिकेट मंडळ हे मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराला उत्तेजन देते. ही गोष्ट अविश्वसनीय अशीच आहे. मी बऱ्याच वेळी यहा मुद्दा उठवला होता."
पगारवाढीसाठी बांगलादेशच्या सर्व क्रिकेटपटूंनी पुकारला संप; भारताचा दौरा आला धोक्यातआपला पगार वाढवण्याता यावा, यासाठी आता बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी संप पुकारला आहे. बांगलादेशच्या खेळाडूंनी ऐन मोक्यावर संप पुकारला असून त्यामुळे आता त्यांचा भारताचा दौरा धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.
आपला पगार वाढवण्यात यावा, यासाठी बांगलादेशच्या संघातील सर्व क्रिकेटपटूंनी संप पुकारला आहे. भारतीय दौऱ्याच्या तोंडावर हा संप पुकारण्यात आला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेनंतर बांगलादेशचा संघ भारतामध्ये येणार होता. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाकडे फार कमी अवधी असल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्याविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या कर्णधारपदी 'हा' खेळाडूबांगलादेशचा संघ काही दिवसांमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी बांगलादेशचे कर्णधार एका खास खेळाडूला देण्यात आले आहे.
गुरुवारी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या पंधरा सदस्यीय खेळाडूंची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनकडे सोपवण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन ट्वेन्टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
बांग्लादेशची टी20 टीम : शाकिब अल हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.