Join us  

Shocking: ट्वेंटी-20 सामन्यावर 225 कोटींचा सट्टा, BCCI करणार चौकशी

गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना उघडकीस आल्यामुळे पुन्हा एकदा फिक्सिंगचं जाळं पसरू लागल्याचं दिसत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 7:30 PM

Open in App

भारतात पुन्हा एकदा फिक्सिंग आणि बेटींगचं जाळं विस्तारु लागलं असल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्याभरात सट्टेबाजीच्या अनेक घटना समोर आल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी पथकानंही चौकशीचा धडाका लावला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी तर सट्टेबाजीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही आणि ताकीद दिल्यानंतरही तसा प्रयत्न कोण करत असेल, तर ती लीग रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. पण, एका इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसात तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या एका सामन्यावर 225 कोटींचा सट्टा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या एका अहवालानुसार तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या एका सामन्यात 225 कोटींचा सट्टा लागला आहे. तुती पायरट्स आणि मधुराई पँथर्स यांच्यातील सामन्यावर हा सट्टा लागला आहे. सट्टा लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळ Betfairवर हा सट्टा लावण्यात आल्याचे समजते. त्यावरून पथकानं बीसीसीआयला अशा लीगवर बंदी घालण्यात यावी, यावर विचार करण्यात यावा असे सांगितले आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी बेटींग झाली नसल्याचे सांगितले आहे. पण, या लीगमधील तुती पायरट्स संघाच्या दोन सह मालकांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे निलंबनाची कारवाई झाली आहे. 

याआधी कर्नाटक प्रीमिअर लीगमध्येही (केपीएल) काही खेळाडू आणि बुकींना अटक करण्यात आली आहेत. या लीगमधील सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने अटक केली होती. बंगळुरूमध्ये याआधी भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यानंतर केपीएलमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसाद आणि बॅटिंग प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केला होती.

सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 च्या मोसमात सहभागी होता. तसेच त्याला  मुंबई आणि दिल्ली संघाने देखील आपल्या संघात घेतले होते. 

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुलीमॅच फिक्सिंगटी-20 क्रिकेट