Join us  

मॅच फिक्सिंगसंबंधी धक्कादायक खुलासा! इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील अॅशेस मालिकेवर फिक्सिंगचे सावट

अॅशेस मालिकेतील तिस-या कसोटी सामन्याआधी इंग्लंडच्या 'द सन' या प्रसिद्ध वर्तमानपत्राने फिक्सिंगसंबंधी धक्कादायक खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 10:16 AM

Open in App
ठळक मुद्देएका सत्राच्या खेळात किंवा एका षटकात किती धावा निघतील हे फिक्सि करणे सहज शक्य असल्याचे वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.ग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे.

लंडन - क्रिकेट विश्व पुन्हा एकदा फिक्सिंगच्या आरोपाने हादरुन गेलं आहे. अॅशेस मालिकेतील तिस-या कसोटी सामन्याआधी इंग्लंडच्या 'द सन' या प्रसिद्ध वर्तमानपत्राने फिक्सिंगसंबंधी धक्कादायक खुलासा केला आहे. या वर्तमानपत्राने पैसे घेऊन स्पॉट फिक्सिंग करणारे काही फिक्सर शोधून काढल्याचा दावा केला आहे. फक्त दीड कोटी रुपयांमध्ये  कुठल्याही सामन्यात फिक्सिंग शक्य असल्याचे सनने म्हटले आहे. 

एका सत्राच्या खेळात किंवा एका षटकात किती धावा निघतील हे फिक्सि करणे सहज शक्य असल्याचे वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात फिक्सिंग झाल्याचे कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पदाधिका-यांनी चिंता व्यक्त केली आहे. द सनच्या वार्ताहारांनी स्टिंग ऑपरेशन केले व नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांना माहिती दिली.          

ऑक्टोंबर महिन्यात भारत-न्यूझीलंड सामन्याआधी पीच फिक्सिंगसंबंधी खुलासा झाला होता. पुण्यात होणा-या सामन्याआधी इंडिया टुडेच्या रिपोर्टरने बुकी असल्याचे भासवून पाडुंरंग साळगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी साळगावकर यांनी रिपोर्टरच्या मागणीनुसार पिच बनवून देण्याची तयारी दाखवली. 

रिपोर्टरने साळगावकर यांना दोन क्रिकेटपटूंना खेळपट्टीवर बाऊंस हवा आहे हे होऊ शकते का ? असा प्रश्न केला. त्यावर साळगावकर यांनी निश्चित तशी खेळपट्टी मिळेल असे उत्तर दिले. 337 धावांचा यशस्वी पाठलागही करता येऊ शकतो असे साळगावकर ऑन कॅमेरा बोलले. साळगावकर यांनी त्या रिपोर्टरला खेळपट्टीची पाहणी करण्याचीही परवानगी दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचे हे थेट उल्लंघन आहे. 

                                                                        

टॅग्स :क्रिकेटअॅशेस मालिका