मुंबई : यंदाचा विश्वचषक इंग्लंडने उंचावला. विश्वाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकता आला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. पण यावेळी इंग्लंडचा संघ फेव्हरीट नव्हताच, असा धक्कादायक खुलासा इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने केला आहे.
याबाबत मॉर्गन म्हणाला की, “ विश्वचषकात आम्ही सर्वात चांगला सामना खेळलो तो उपांत्य फेरीचा. या सामन्यात आमच्याकडून सांघिकरीत्या दर्जेदार खेळ झाला होता. पण अंतिम फेरीत मात्र आम्ही फेव्हरीट नव्हतो. काही काळ आम्ही सामन्यावर वर्चस्व राखले. पण या सामन्यात जास्त काळ न्यूझीलंडचा संघ फेव्हरेट होता.“
विश्वचषकातील यशाबबात मॉर्गान म्हणाला की, “ आम्हाला 2015च्या विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आम्ही संघबांधणी करायला सुरुवात केली. त्यावेळीच आम्ही 2019च्या संघाचा विचार केला होता. या चार वर्षांमध्ये एक ध्येय ठेवून आम्ही अथक मेहनत घेतली आणि त्याचेच फळ आम्हाला मिळाले.“
बुमराने गोलंदाजीमध्ये ‘हा’ बदल करावा, सांगतोय झहीर खान
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्याच्या घडीला अव्वल गोलंदाज आहे. पण अजूनही बुमराच्या गोलंदाजीमध्ये काही गोष्टींची थोडू कसूर जाणवते. बुमराने जर फक्त हा बदल केला, तर त्याची गोलंदाजी अधिक भेदक होऊ शकतो, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान सांगत होता. टी-10 लीगच्या निमित्ताने झहीरने ‘लोकमत डॉट कॉम’शी खास बातचीत केली. यावेळी बुमराने गोलंदाजीमध्ये कोणता बदल करायला हवा, हे झहीरने सांगितले.
झहीर म्हणाला की, “ बुमराचा प्रोग्रेस फार चांगला आहे. फार कमी कालावधीमध्ये तो भरपूर काही शिकला आहे. त्यामुळे यापुढेही तो असंच करत राहीलं, अशी आशा आहे. पण बुमराने जर स्विंगवर अजून फोकस करायला हवा. बुमरा जर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू आऊट स्विंग करायला लागला तर त्याच्या गोलंदाजीची धार वाढत जाईल. कारण त्याच्याकडे गोलंदाजी शैलीचा अॅडवांटेज आहे. कारण तो ज्या अँगलने चेंडू टाकतो, ते फलंदाजांना कळत नाही. त्याचबरोबर स्विंग करायला लागला, तर तो फलंदाजाला चांगलं हतबल करू शकेल.”
टी-10 लीगबाबत झहीर म्हणाला की, “ टी-10 अजून वाढते आहे. बाकिच्या देशांमध्ये हे क्रिकेट चांगलं वाढतंय. अजून अशा लीग खेळवल्या गेल्या पाहिजेत. जास्त टीम येतात तेव्हा खेळ वाढत असतो. टी-10 जेव्हा जास्त देश खेळतील आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढेल. तेव्हा हा खेळ मोठा होईल.”
Web Title: Shocking: England's are not favorite at the World Cup, captain Eoin Morgan revealed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.