ठळक मुद्देमैदानात सर्वात महत्वाची भूमिका असते ती पंचांची.कारण पंचांच्या निर्णयानुसारच सामना खेळवला जात असतो.पण पंचांकडून अशी मोठी चूक घडली की त्यांना ती कळलीदेखील नाही.
नवी दिल्ली : मैदानात सर्वात महत्वाची भूमिका असते ती पंचांची. कारण पंचांच्या निर्णयानुसारच सामना खेळवला जात असतो. पण पंचांकडून अशी मोठी चूक घडली की त्यांना ती कळलीदेखील नाही. एका गोलंदाजांने एका सामन्यात तब्बल 90 नो बॉल टाकले. पण मैदानावरील पंचांनी एकदाही नो बॉल दिला नाही.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये 23-27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये एक कसोटी सामना खेळवण्यात आला. हा मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होता. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर 42 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा हा मालिकेतील तिसरा विजय होता. इंग्लंडने कसोटी मालिका 3-0 अशी खिशात टाकली. इंग्लंडने 1963 सालानंतर पहिल्यांदाच परदेशी धर्तीवर विजय मिळवण्याची किमया साकारली आहे. भारताने गेल्या वर्षी श्रीलंकेला 3-0 असे पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाने 2004 साली श्रीलंकेवर 3-0 असा विजय मिळवला होता.
श्रीलंकेचा गोलंदाज लक्षन संदाकनने दोनदा इंग्लंडच्या बेन स्टोक्सविरुद्ध अपील केले होते. पण लक्षनचे हे दोन्ही चेंडू नो बॉल असल्याचे तिसऱ्या पंचांनी सांगितले. त्यानंतर एका संकेतस्थळाने याबाबत मेहनत घेतली आणि लक्षनचे 40 टक्के चेंडू नो बॉल असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. या सामन्यात लक्षनने 38 षटके टाकली. त्यानुसार लक्षनने 90 नो बॉल टाकल्याचे निदर्शनास आले आहे.
तिसरा सामना कोलंबो येथे खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेपुढे विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 284 धावांवर संपुष्टात आला होता. पहिल्या दोन कसोटीत सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला कणखरता दाखवता आली नाही. मात्र कुशल मेंडिस(86) आणि रोशन सिल्व्हा (65) यांनी सहाव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी करत विजयाची आस कायम ठेवली होती. मात्र एकवेळ श्रीलंकेचे नऊ फलंदाज 226 धावांवरच माघारी परतले होते. पण तळाच्या मलिंदा पुष्पकुमार याने 40 चेंडूत 42 धावा फटकावत सामन्यात रंगत आणली. अखेरीच लीच याने ही भागीदारी तोडून इंग्लंडला विजय मिळवून दिला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 284 धावांवर गारद झाला.
इंग्लंडने श्रीलंकेच्या संपूर्ण दौऱ्यात वर्चस्व गाजवले. सुरुवातीला एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने 3-1 ने विजय मिळवला. त्यानंतर एकमेव टी-20 सामन्यातही बाजी मारली होती.
Web Title: Shocking ... 'He' bowled 90 no balls, but the umpires did not understand anything
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.