नवी दिल्ली : क्रिकेट जगताला लागलेली क्रिकेटची कीड काही नष्ट होण्याचे नाव घेताना दिसत नाही. कारण सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूला मॅच फिक्संगची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलशी दोन व्यक्तींनी संपर्क साधला आणि त्याच्याकडून त्यांनी काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याला सामन्यामध्ये खेळताना काही गोष्टी करू शकतो का, असेही विचारले. उमरने या व्यक्तींशी संपर्क तोडला असून याबाबतची माहिती पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला दिली आहे.
सध्याच्या घडीला कॅनडामध्ये ग्लोबल ट्वेन्टी-२० लीग सुरु आहे. या लीगमध्ये भारताचा युवराज सिंगही खेळत आहे. या लीगमधील सामन्यात मॅच फिक्संग करण्यासाठी उमरला सांगण्यात आले होते. या दोन व्यक्तींमध्ये एकाचे नाव मंसूर खान आणि दुसऱ्याचे कृष असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांपासून सर्वच संघांनी लांब रहावे, असा इशारा भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिला आहे.
Web Title: Shocking! Match fixing offer to Pakistani cricketer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.