नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या संगनमताने भारतीय संघ चालतो, असे आरोप काही दिवसांपूर्वी चाहत्यांनी केले होते. कोहली आणि शास्त्री ही जोडगोळी सर्वांनाच भारी पडते, असेही म्हटले गेले होते. पण आता कोहली आणि शास्त्री यांच्यामध्येच वाजल्याचे वृत्त समोर येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी कोहली आणि शास्त्री यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये एकमत नसल्याचे प्रकाशित केले आहे.
क्रिकेट सल्लगार समितीने काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर नियुक्ती केली होती. त्यानंतर निवड समितीने सहाय्यक प्रशिक्षकांची निवड केली होती. पण आता माझ्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींना निवडण्याचा अधिकार मला असायला हवा, असे वक्तव्य शास्त्री यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर या कोहली आणि शास्त्री यांच्यामध्ये फूट पडल्याचं बोललं जात आहे.
निवड समितीने सहाय्यक प्रशिक्षकपदी भारत अरुण आणि एस. श्रीधर यांची पुन्हा एकदा निवड केली. पण फलंदाजी प्रशिक्षकपदी संजय बांगरऐवजी विक्रम राठोडची निवड करण्यात आली. त्याचबरोबर स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग प्रशिक्षक म्हणून निक बेवची निवड करण्यात आली. या गोष्टींमुळे या दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते.
स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग प्रशिक्षकपदासाठी वेबबरोबर ल्यूक वूडहाऊस, ग्रँट लुडेन यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाव पसंती देण्यात आली होती. त्याचबरोबर या उमेदवारांमध्ये रजनीकांत सिवगनंन आणि आनंद दाते यांचाही समावेश करण्यात आला होता. पण या सर्वांना वगळून वेबला संधी देण्यात आली.
वेबला संधी देण्यावरून शास्त्री आणि कोहली यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. कोहलीने या गोष्टीमध्ये देशाचे नागरीकत्व पाहू नये, असे म्हटले आहे. पण सहाय्यक प्रशिक्षक भारताचे असावेत, असे शास्त्री यांना वाटते. त्यामुळे एका सहाय्यक प्रशिक्षकावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Title: Shocking! Ravi Shastri and Virat Kohli contradict on selection of support staff of team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.