ठळक मुद्देभारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे अनुभवी खेळाडू नाहीत. स्मिथ आणि वॉर्नर यांचे संघात पुनरागमन होणार असल्याचे वृत्त येऊन धडकले आहे.
सिडनी : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे अनुभवी खेळाडू नाहीत. त्यामुळे भारताला यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे, असे म्हटले जात आहे. पण स्मिथ आणि वॉर्नर यांचे संघात पुनरागमन होणार असल्याचे वृत्त येऊन धडकले आहे.
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर भारताविरुद्धच्या दौऱ्यात खेळणार नाही, असे म्हटले जात होते.
आयसीसी आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने बंदी घातल्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये स्मिथ आणि वॉर्नर यांना खेळता आले नव्हते. पण त्यांची बंदी एका वर्षात उठल्यानंतर ते आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात. सनराइजर्स हैदराबाद या संघाकडून वॉर्नर आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून स्मिथ खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
Web Title: Shocking ... Steven Smith and David Warner returning to the squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.