नवी दिल्ली : क्रिकेटला जंटलमन्स गेम, असे म्हटले जाते. हा खेळ सभ्य गृहस्थांचा आहे. आतापर्यंत बऱ्याच संघाती या खेळाला सभ्य ठेवले आहे. पण ऑस्ट्रेलियाचा संघ या गोष्टीला अपवाद ठरला आहे, असे आता म्हणावे लागेल. कारण ऑस्ट्रेलियाचा संघात कुणीच जंटलमन नाही, असे खळबळजनक विधान एका क्रिकेटपटूने केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात सभ्य खेळाडू नाहीत, अशी टीका इंग्लंडच्या एका खेळाडूने केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. पण या रागातून या खेळाडूने हे विधान केलेले नाही, तर भर मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शिव्या दिल्या असल्याचे विधान या खेळाडूने केले आहे.
" ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्तन मैदानात चांगले नसते. या गोष्टीचा प्रत्यय मला 2015 साली झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात आला होता. माझ्यावर दबाव आणण्यासाठी सुरुवातीला त्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मला चक्क शिव्या दिल्या. मी मैदानात त्यांना त्यांना एकही शब्द बोललो नाही. कारण त्यांची कृती ही असमर्थनीय होती," असे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सांगितले आहे.