कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रिकेटला एक धक्का बसला आहे. त्रिपुराच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाची सदस्य अयांती रेंग हिनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी खोलीत तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या नजीक कोणतीच सुसाईट नोट सापडलेली नाही. चार भावंडांमध्ये अयांती ही सर्वात लहान होती. मागील वर्षांपासून ती त्रिपुराच्या 19 वर्षांखालील संघाची सदस्य होती. दमदार कामगिरीच्या जोरावर तिनं राज्याच्या 23 वर्षांखालील ट्वेंटी-20 संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. त्रिपुराची राजधानी अगरतला येथून 90 किलोमीटर लांब असलेल्या रींग विभागात ती राहायची. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अयांतीच्या निधनावर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिन तिमिर चंदा यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले,''राज्यानं एक उदयोन्मुख खेळाडू गमावला. ती 16 वर्षांखालील संघाची सदस्य होती. तिच्या मृत्यूच्या बातमीनं सर्वांना धक्का बसला आहे.'' ती कोणत्या तणावाखाली होती का, या प्रश्नावर ते म्हणाले, मागील मोसमापर्यंत तरी तसे काही जाणवलं नाही. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर क्रिकेट सराव बंदच होता. तिच्या कुुटुंबातील काही समस्या असतील, त्याबाबत आम्हाला माहिती नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?
बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा
CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई
Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण...
3 टीम,1 मॅच! क्रिकेट नव्या ढंगात; दिग्गजांच्या साक्षीनं 'या' देशात 27 जूनला होणार आगळावेगळा सामना