Join us  

किराणा दुकानदाराने मुलाला बनवले क्रिकेटर, आता भारतासाठी वर्ल्ड कप गाजवणार!

Siddharth Yadav : अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हापासून गाझियाबादचा दुकानदार श्रावण यादवचा मुलगा सिद्धार्थ यादवची (Siddharth Yadav) खूप चर्चा होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 1:07 PM

Open in App

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिजमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या एका किराणा दुकानदाराच्या मुलाची निवड करण्यात आली आहे. अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हापासून गाझियाबादचा दुकानदार श्रावण यादवचा मुलगा सिद्धार्थ यादवची (Siddharth Yadav) खूप चर्चा होत आहे. 

14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत वेस्ट इंडिजमध्ये होणारा अंडर-19 विश्वचषकासाठी सिद्धार्थ यादवची भारतीय संघात निवड झाली आहे. गाजियाबादच्या कोटगावमध्ये सिद्धार्थचे वडील एक किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थचे वडील श्रवण यादव यांची देखील क्रिकेटर बनण्याची मनापासून इच्छा होती परंतु ते नेट बॉलरच्या पुढे जाऊ शकले नाहीत. आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युएईमध्ये आशिया कप आणि वेस्ट-इंडीजमध्ये (West-Indies) अंडर-19 विश्वचषक खेळणार आहे. 

सिद्धार्थच्या वडिलांची पहिल्यापासूनच इच्छा होती की मुलाने क्रिकेटर (Cricketer) बनावे. वडील श्रवण यादव म्हणाले की, जेव्हा पहिल्यांदा सिद्धार्थने बॅट हातात घेतली होती तेव्हाच मला वाटले होते की तो एक चांगला डावखूरा हाताचा फलंदाज बनणार आहे. आणि तिच भविष्यवाणी सिद्धार्थने खरी करुन दाखवली. त्याने खूप मेहनत केली आणि आज तो भारताच्या अंडर- 19 संघाचा भाग आहे.  8 व्या वर्षापासून सिद्धार्थने आपली मेहनत डबल केली, आणि याच मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. 

सिद्धार्थचे वडील श्रवण यादव म्हणाले की, सुरवातीला मी रोज 3 तास दुकान बंद करुन त्याचा सराव घेत असे. सुरवातीच्या काही काळात सिद्धार्थच्या वडीलांनी सिद्धार्थवर प्रचंड मेहनत घेतली कारण त्यांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न मुलगा सिद्धार्थ पूर्ण करणार होता. प्रत्येक लहान शहरातील क्रिकेटपटूच्या मागे मोठा संघर्ष असतो.  सिद्धार्थ यादवसोबत या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना छोट्या शहरांमधून बाहेर पडून नवीन स्थान मिळवायचे आहे. 

दरम्यान, पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या खेळाडूंकडून पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा, अशी संपूर्ण देशाची अपेक्षा आहे. 2020 मध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध फायनलमध्ये पराभूत झाला होता. यापूर्वी 2018 मध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App