Join us  

मोहम्मद आमीरच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना पत्नीकडून सडेतोड उत्तर

आमीरने अचानक वयाच्या 27व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचे जाहिर केले होते. त्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त करत टीका केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 2:52 PM

Open in App

मुंबई: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने नुकताच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात भेदक मारा केला होता. त्याने 8 सामन्यांत 17 विकेट्स घेत आपला दबदबा दाखवून दिला. पण, संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

त्यानंतर आमीरने अचानक वयाच्या 27व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचे जाहिर केले होते. त्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त करत टीका केली होती.  तसेच गेल्या काही दिवसात आमीरने ब्रिटनच्या व्हिसाची मागणी केल्याने तो यापुढे पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळणार नाही अश्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आमीरची पत्नी नरजिसने हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत. 

तिने सांगितले की, खरं तर आम्हाला आमच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. परंतु माझा पती अमीरबाबत ज्या प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्या चूकीच्या असून आमीरने इंग्लंड किंवा इतर कोणत्याही देशासाठी खेळू नये, तसेच त्याला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला आवडतं. इतकेच नाही तर जर आमच्या मुलीला देखील क्रिकेट खेळायची इच्छा असल्यास तिने देखील तिच्या वडिलांप्रमाणे पाकिस्तानचे नेतृत्व करेल अशी देखील आमिरची इच्छा असल्याचे तिने स्पष्ट केले.

मर्यादित षटकांच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात मोहम्मद आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करणं हे माझं स्वप्न होतं. आगामी टी-२० विश्वचषकात मी संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय आपल्यासाठी सोपा नसल्याचंही आमीरने सांगितलं. यावेळी आमीरने आपल्याला दिलेल्या संधीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :पाकिस्तानशोएब अख्तर