एका खेळाडूवर अधिक अवलंबून राहू नये!

एकदिवसीय व कसोटी क्रिकेटच्या उलट एक खेळाडू टी२० मध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर अधिक प्रभावित करतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:27 AM2019-04-16T03:27:15+5:302019-04-16T03:27:56+5:30

whatsapp join usJoin us
Should not be more dependent on one player! | एका खेळाडूवर अधिक अवलंबून राहू नये!

एका खेळाडूवर अधिक अवलंबून राहू नये!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले लिहितात...
एकदिवसीय व कसोटी क्रिकेटच्या उलट एक खेळाडू टी२० मध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर अधिक प्रभावित करतो. ही बाब केवळ धावा फटकावणे किंवा बळी घेण्याची नाही, तर प्रतिस्पर्धी संघही त्या हिशेबाने आपली रणनीती ठरविण्यास प्रारंभ करते आणि संघ गरजेपेक्षा त्याच्यावर अधिक अवलंबून राहतो. या दोन्ही बाबी या आठवड्यात खेळल्या गेलेल्या लढतींमध्ये अनुभवाला मिळाल्या.
सीएसकेविरुद्ध केकेआर संघ एकवेळ १८० पेक्षा अधिक धावा फटकावण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. कदाचित ही धावसंख्या विजयासाठी पुरेशी ठरली असती, पण अखेरच्या षटकांमध्ये केकेआरची भिस्त पूर्णपणे आंद्रे रसेलच्या कामगिरीवर अवलंबून होती. त्याला ज्यावेळी इम्रान ताहिरने बाद केले त्यावेळी केकेआरकडे अधिक पर्याय शिल्लक नव्हते. संघाकडे अन्य काही चांगले खेळाडू आहेत, पण रसेलवर अवलंबून राहिल्यामुळे संघाला प्रभावित केले. अशा स्थितीत १६० च्या जवळजवळ धावसंख्येच्या जोरावर ते लढत तर देऊ शकत होते, पण विजयाचा दावा करू शकत
नव्हते.
असेच सनरायझर्स हैदराबाद संघात राशिद खानबाबत बघण्यास मिळाले. तो नेहमी जसे बळी घेतो तसे बघायला मिळाले नाही. त्याचा इकॉनॉमी रेट चांगला होता. याचा अर्थ राशिदच्या गोलंदाजीवर प्रति षटक सहाच्या सरासरीने धावा काढणे नुकसानदायक नाही, याची प्रतिस्पर्धी संघांना कल्पना आली आहे. त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला तर त्याला बाद करण्याची संधी देण्यासारखे आहे.
हैदराबाद संघ राशिदकडून २२ धावांत बळी न घेण्यापेक्षा ३५ धावांत ३ बळी घेण्याच्या कामगिरीमुळे खूश होईल. टी२० मध्ये फलंदाजाच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षकांचे कठडे उभे करण्याची संधी मिळत नाही आणि फलंदाजाने जोखीम न पत्करता खेळण्याची भूमिका स्वीकारली तरी अशी कामगिरी सोपी नसते. बळी घेण्याची भूमिका आता अन्य दुसऱ्या गोलंदाजाला निभवावी लागेल. फलंदाजाला जोखीम पत्करण्यास भाग पाडणे आणि बळी घेण्याची क्षमता राखणारे गोलंदाज मोजकेच असतात.
याच विभागात चेन्नई सुपरकिंग्स संघ स्पर्धेतील अन्य संघाच्या तुलनेत आघाडीवर भासतो. गेल्या वर्षी ११ सामनावीर पुरस्कार ८ खेळाडूंमध्ये शेअर झाले. यंदा आतापर्यंत वेगवेगळे खेळाडू मोक्याच्या वेळी छाप सोडून गेले. संघ यासाठी योजना आखू शकतात? निश्चितच ते असे करू शकत नाहीत. सनरायझर्सने लिलावामध्ये किती समजदारी दाखवली, हे दिसतेच.

Web Title: Should not be more dependent on one player!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.