सचिन कोरडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : साखळी फेरीत टीम इंडियाने अव्वल स्थान गाठून या फेरीचा जबरदस्त शेवट केला आणि पुढचा इरादाही स्पष्ट केला. टीम इंडियाकडून विश्वचषकात काही विक्रमही रचले गेले. त्यात हिटमॅन रोहित शर्माने नोंदवलेले विक्रम अग्रस्थानी आहेत.
विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या या सलामीवीराने प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवली आहे. पाच शतके झळकाविणाऱ्या रोहितची कामगिरी अविस्मरणीय अशी आहे.
1रोहितने पहिल्याच सामन्यात म्हजणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकीय सुरुवात केली होती. १६ डावांत ६ शतके झळकावीत त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनला
६ शतकांसाठी ४५ डाव खेळावे लागले होते.
2सलग तीन शतके म्हणजे शतकांची हॅट्ट्रिक करणारा रोहित हा विराटनंतर दुसरा फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने अशी कामगिरी गेल्या वर्षी केली होती. श्रीलंकेच्या संगकाराने २०१५ मध्ये सलग तीन शतके केली होती. यंदा ती रोहितच्या नावावर आहेत.
3विदेशी भूमीवर सर्वाधिक शतके नोंदवण्याच्या विक्रमाशी रोहितने बरोबरी साधली आहे. विदेशी भूमीवर सचिन तेंडुलकर व सईद अन्वर यांनी यूएई मध्ये तर, ए.बी. डिव्हिलियर्सने भारतात प्रत्येकी ७ शतके केली आहेत.
4विश्वचषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाºया विक्रमाशीही रोहितने बरोबरी साधली. यापूर्वी, अरविंद डिसिल्वा (१९९६), लान्स क्लुझनर (१९९९) आणि युवराज सिंग (२०११) यांनी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवलेआहेत.
5२०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून कर्णधार कोहलीने ३४४९ धावा केल्या. त्यासुद्धा ८०.२० च्या सरासरीने. यामध्ये त्याच्या १४ शतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, रोहितने ३४३५ धावा फटकावल्या आहेत. त्याची सरासरी ६७.३५ अशी आहे. यामध्ये रोहितच्या १७ शतकांचा समावेश आहे.
6त्याने २०६३ धावा ७३.६७ च्या सरासरीने केल्या आहेत. यात त्याच्या दहा शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात ३६५ दिवसांत १० शतके कोणालाही करता आलेली नाहीत
Web Title: ... this is 'show hit'!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.