Pakistan Vs Australia, 3rd Test - पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत मैदानावर राडा झालेला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला पाकिस्तानी अम्पायरचा निर्णय आवडला नाही आणि कसोटीच्या चौथ्या दिवशी लाईव्ह राडा झाला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील २१व्या षटकात हा सर्व प्रकार घडला. वॉर्नर क्रिज सोडून फलंदाजी करत असताना अलीम दार व अहसान रझा हे मैदानावरील अम्पायर त्याच्याजवळ गेले आणि त्याला खेळपट्टीच्या मधोमध धावू नकोस अशी ताकिद दिली.
३५ वर्षीय वॉर्नरला अम्पायरचे हे बोलणे आवडले नाही आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. मी काही चुकीचं करत नाही, असे म्हणत त्याने अम्पायरशी हुज्जत घातली.
- तो म्हणाला, आता मी कसं खेळावं हे तुम्ही मला सांगणार आहात का?
- त्यावर रझा म्हणाले, तू क्रिजच्या आत राहून खेळ.
- त्यावर वॉर्नर म्हणाला, मला रूल बूक दाखवा. तुम्ही जो पर्यंत ते दाखवत नाही, तोपर्यंत मी खेळ सुरू करणार नाही.
- वॉर्नर व अम्पायरच्या वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ..
वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. त्यात वॉर्नरने ५१ धावा केल्या, तर ख्वाजाने १०४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३ बाद २२७ धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १ बाद ८५ धावा केल्या आहेत. अब्दुल्लाह शफिक २७ धावांवर बाद झाला. इमाम-उल-हक ४८ धावांवर खेळतोय.