नवी दिल्ली:हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई 'प्ले ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर पडणारा संघ ठरला. हार्दिक आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची कामगिरीही काही विशेष झालेली नाही. रोहितने या हंगामात काही प्रसंगी धावा केल्या, तर हार्दिकने सपशेल निराश केले. यावर माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यांनी रोहित आणि हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा सल्ला मुंबई संघ व्यवस्थापनाला दिला आहे.
पुढे सेहवाग म्हणाला, 'ईशान किशन यंदाचा संपूर्ण हंगाम खेळला; पण तो एकदाही पॉवर प्लेच्या नंतर खेळू शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाच रिटेन करता येईल.'
बॉलिवूडचे उदाहरण देत सेहवाग म्हणाला, 'शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान हे तिन्ही सुपरस्टार एकाच चित्रपटात असतील तर तो चित्रपट हिट ठरेल, हे कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी चांगले काम करावे लागेल. चित्रपटाची स्क्रिप्टही चांगली हवी. संघातील सर्व दिग्गजांना सांधिक कामगिरी करावी लागेल. रोहित शर्माने एक शतक झळकावले; पण तोही सामना मुंबईने गमावला होता. मग इतर सामन्यांतील कामगिरीचे काय?'
केवळ दोघांनाच रिटेन करा
मनोज तिवारीनेही मुंबईच्या खेळाडूंवर ताशेरे ओढले. मनोज म्हणाला, 'मुंबईने बुमराह आणि सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवावे आणि पुढील हंगामात या दोघांपैकी एकाला संघाचा कर्णधार करावे. माझ्या मते, रोहितलाही रिटेन करू नये.