आशियाई क्रिकेट परिषदेनं ( एसीसी) आशिया चषक 2020 स्थगित झाल्याची घोषणा गुरुवारी केली. पण, बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यानं यंदा आशिया चषक होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू चांगलेच खवळले. त्यामुळेच पीसीबी आणि क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर टीका केली. पीसीबीचे मीडिया व्यवस्थापक समीऊल हसन बर्नी यांनी सांगितले की, आशिया चषकाबद्दलची घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेनं करावी, बीसीसीआयनं नव्हे.
सुनील गावस्कर यांनी कोणत्या संघाविरुद्ध घेतली होती 10 हजारावी धाव? पाहा तो ऐतिहासिक क्षण
''सौरव गांगुलीकडून करण्यात आलेल्या विधानाला काहीच अर्थ नाही. तशी विधान त्यांच्याकडून प्रत्येक आठवड्याला केली जातात आणि त्यामुळे त्याला काडीची किंमत किंवा महत्त्व नाही. आशिया चषक स्पर्धेबद्दलचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेईल. त्याची घोषणा फक्त आणि फक्त परिषदेचे प्रमुख नझमुल हसन करतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या पुढच्या बैठकीची तारीखही अजून जाहीर व्हायचीय,''असं पीसीबीकडून सांगण्यात आले होते.
Shocking : ऑलिम्पिकपटूचा समुद्रात बुडून मृत्यू; मालकाच्या प्रतिक्षेत कुत्रा किनाऱ्यावर बसून!
त्यात आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ याची भर पडली आहे. त्यानं गांगुली शक्तीचा माज दाखवत असल्याची टीका केली आणि त्यानं आशियाई देशांचं नुकसान होत असल्याचेही तो म्हणाला. त्यानं ट्विट केलं की,''आशिया चषक रद्द किंवा नाही याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेईल. शक्तीचा माज दाखवून आशियाई देशांचंच नुकसान होणार आहे. सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट आणि आयपीएल याकडे लक्ष द्यावे.''
आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यकारिणीची गुरुवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा यंदा सप्टेंबरमध्ये होणार होती. या बैठकीत आशिया चषक स्पर्धेवर चर्चा झाली आणि ती खेळवण्याचा प्रयत्न होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे आणि प्रवासबंदीमुळे ती होणे शक्य दिसत नसल्याचे एसीसीने मान्य केले. खेळाडूंची सुरक्षा आणि अन्य गोष्टी लक्षात घेऊन अखेर यंदा आशिया चषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
२०२१ मध्ये जून महिन्यात ही स्पर्धा खेळवण्याचा विचार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार आहे, तर २०२२ची आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च
Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!
टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!
शाहरुख खाननं दिलेला शब्द पाळला नाही; सौरव गांगुलीचा KKRवर गंभीर आरोप