Join us  

विकेट मिळताच गोलंदाजांने घातल्या कोलांटउड्या; अनोख्या सेलिब्रेशनची रंगली चर्चा! 

क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी होत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 6:33 PM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी होत असतात. काही खेळाडू आपल्या अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधत असतात. सेलिब्रेशन करण्याच्या बाबतीत फलंदाजांपेक्षा गोलंदाज नेहमीच आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. खेळाडूंची आनंद साजरा करण्याची शैली चाहत्यांना देखील भुरळ घालत असते. सध्या शापेजा क्रिकेट लीगमधील (Shpageeza Cricket League)एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोलंदाजांने फलंदाजाचा त्रिफळा उडवताच जे काही केले ते पाहून सर्वांनाच हशा पिकला. गोलंदाजाने बळी घेताच कोलांटउड्या मारायला सुरूवात केली. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

अनोख्या सेलिब्रेशनची रंगली चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ शापेजा क्रिकेट लीगमध्ये खेळल्या गेलेल्या १६ व्या सामन्यामधील आहे. या सामन्यात मिस ऐनक नाइटच्या (mis ainak knights)संघाने पामीर जाल्मीविरूद्ध ६ गडी राखून विजय मिळवला. मात्र चर्चा रंगली ती गोलंदाजाच्या सेलिब्रेशनची. कारण ऐनक नाइटच्या संघाचा फलंदाज दिकुल्लाह अटलीचा त्रिफळा उडवल्यानंतर गोलंदाज अमीर झझाईने (Amir Zazai)मैदानावर अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन सुरू केले. झझाईने अचानक कोलांटउड्या मारल्याने त्याची एकच चर्चा रंगली. 

झझाईने अटलीचा त्रिफळा उडवल्यानंतर मैदानावर कोलांटउड्या मारायला सुरूवात केली. त्याचे अनोखे सेलिब्रेशन पाहून सर्वांनाच धक्का बसला. ज्या चेंडूवर त्रिफळा उडला त्या चेंडूला अटली प्रेक्षकांकडे लावण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्यात त्याला पूर्णपणे अपयश आले. फलंदाजांची बत्ती गुल करण्यात झझाईला यश आले आणि त्याने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाट्विटर
Open in App