आयपीएल स्पर्धेतील १८ व्या हंगामात नव्या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यरने कमालीची कामगिरी करून दाखवली. दमदार खेळीसह त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरनं नाबाद ९७ धावांची खेळी केली. या खेळीसह श्रेयस अय्यरनं एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएलमध्ये ३ वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून फ्रँचायझी करताना अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम त्याने करून दाखवलाय. याआधी अशी कामगिरी कुणालाही जमलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मध्ये ३ वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना अर्धशतकी खेळीपंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करण्याआधी श्रेयस अय्यरनं गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले होते. गत हंगामात दोन वेळा त्याने ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. याशिवाय २०२२० च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना त्याच्या भात्यातून अर्धशतक आल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलच्या इतिहासातील तो पहिला असा खेळाडू आहे ज्याने तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीचे नेतृत्व करताना अर्धशतक झळकावले आहे.
अय्यरशिवाय ३ फ्रँचायझी संघाचे चौघांनी नेतृत्व केले, पण..
श्रेयस अय्यरशिवाय अजिंक्य रहाणे, कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि स्टीव स्मिथ या चार दिग्गजांनी आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व केले आहे. पण यातील कुणालाही श्रेयस अय्यरसारखी कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ फायनलही खेळला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं त्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. दोन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांना फायनलपर्यंत नेणारा तो एकमेव कॅप्टन आहे.
धोनीच्या विक्रमाशी बरोबरी डेविड वॉर्नरसह किंग कोहलीचाही रेकॉर्ड मोडला
पंजाब किंग्ज संघाचने नेतृत्व करताना श्रेयस अय्यरनं आयपीएल स्पर्धेत ४१ वा विजय नोंदवला. डेविड वॉर्नरला मागे टाकत आता श्रेयस अय्यरने सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचलाय. सर्वाधिक आयपीएल सामने जिंकण्यात धोनी १३३ सामन्यासह आघाडीवर आहे. ७० सामन्यात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत अय्यरनं त्याची बरोबरी केलीये. आता फक्त रोहित शर्मा त्याच्या पुढे असून या हंगामातील दोन विजयासह तो एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करू शकतो.
आयपीएलमध्ये नेतृत्व करताना ७० सामन्यानंतर सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार
- ४३ : रोहित शर्मा
- ४१* : श्रेयस अय्यर
- ४१ : एमएस धोनी
- ३७ : विराट कोहली
- ३७ : गौतम गंभीर
- ३५ : डेविड वॉर्नर
आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅचेस जिंकणारे कर्णधार
- १३३ - एमएस धोनी (२२६ सामने)
- ८९ - रोहित शर्मा (१५८ सामने)
- ७१ - गौतम गंभीर (१२९ सामने)
- ६८ - विराट कोहली (१४३ सामने)
- ४१* - श्रेयस अय्यर (७१ सामने)
- ४० - डेविड वार्नर (८३ सामने)
टी-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार
- १८९ - एमएस धोनी (३२२ सामने)
- १४० - रोहित शर्मा (२२५ सामने)
- ९८ - गौतम गंभीर (१७० सामने)
- ९६ - विराट कोहली (१९३ सामने)
- ५१ - दिनेश कार्तिक (७७ सामने)
- ५० - संजू सॅमसन (९३ सामने)
- ५० - श्रेयस अय्यर (८४ सामने)*