मुंबई, आयपीएल 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराट कोहलीच्या नेतृत्वकौशल्यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवावी, असाही पर्याय ठेवण्यात येत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरसह अनेक माजी खेळाडूंनीही कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेला संजय मांजरेकर यानेही कर्णधारांच्या गुणतालिकेत रोहित, महेंद्रसिंग धोनी आणि श्रेयस अय्यर यांना कोहलीपेक्षा वरचढ स्थान दिले आहे. इंडियन प्रीमिअर लीगनंतर मांजरेकरने कर्णधारांना दहापैकी गुणांची कमाई केली.
मांजरेकराच्या या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं अव्वल स्थान गाठले आहे. त्याला दहापैकी 9 गुण दिले गेले आहेत. शेन वॉटसनची पाठराखण केल्याबद्दल धोनीचा एक गुण कापण्यात आला. मात्र, याच वॉटसनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या फायनलमध्ये 80 धावांची जीगरबाज खेळी केली होती. चेन्नईला अवघ्या एका गुणाना हार मानावी लागली.
त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला दहापैकी 8 गुण मिळाले आहेत. मांजरेकरने हिटमॅनच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तो म्हणाला,''रोहित हा भरवशाचा कर्णधार आहे. त्याने संपूर्ण लीमध्ये कोणतीही मोठी चूक केली नाही. संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना कसे हाताळायचे याची त्याला पुरेपूर जाण आहे.''
मांकड प्रकरणामुळे वादात अडकलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या आर अश्विनलाही मांजरेकरने 7 गुण दिले आहेत. कर्णधार आणि खेळाडू म्हणून अश्विन उपयुक्त आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला 5, स्टीव्हन स्मिथला 6, दिल्ली कॅपिटल्सच्या श्रेयस अय्यरला 8 गुण देण्यात आले आहेत. कोहलीला 6 गुण देण्यात आले आहेत. म्हणजे श्रेयस अय्यर हा कोहलीपेक्षा उत्तम कर्णधार असल्याचे मांजरेकरला सुचवायचे आहे. सनरायझर्स हैदराबादच्या केन विलियम्सनला 7 गुण मिळाले आहेत.
ICC World Cup 2019 : भारताचा 'हा' खेळाडू ठरणार X फॅक्टर; गंभीरने संगितले चार हुकुमी एक्के
गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार
ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, विजय शंकर 'ती' उणीव भरू शकत नाही; गंभीरनं व्यक्त केली चिंता