मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज आणि आयपीएलमधील कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक जबरदस्त मर्सिडिज-एएमजी जी ६३ ४मॅटिक एसयूव्ही खरेदी केली आहे. श्रेयस अय्यरच्या एसयूव्ही खरेदी करण्याचे फोटो मुंबईतीली एका कारविक्रेत्याने शेअर केले आहेत. या मर्सिडिजची किंमत २.४५ कोटी रुपये आहे.
मर्सिडिज-एएमजी जी ६३ ४मेटीक जी-वॅगन सिरीजमधील टॉप एडिशन आहे. तसेच हा एएमजी ४.० लीटर व्ही ८ बिटुर्बो इंजिनद्वारे संचालित होते. याचं आऊटपूट ४३० किलोवॅट (५८५ एचपी) आणि ८५० एनएमचा पीट टॉर्क आहे. याच्या स्पिडचा विचार केल्यास ही एसयूव्ही ४.५ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी प्रतितास एवढा वेग घेऊ शकते.
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना लँडमार्क कार्स मुंबईने लिहिले की, भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचं एक नवी मर्सिडिझ-बेंझ जी ६३ खरेदी करण्यासाठी अभिनंदन. आम्ही स्टार परिवारामध्ये आपलं स्वागत करतो. तू ही स्टार चालवण्याचा तेवढाच आनंद घेशील जेवढा आनंद आम्हाला तुझा कव्हर ड्राइव्ह पाहताना होतो, अशी अपेक्षा आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरची आयपीएलमधील कामगिरी तितकीशी उल्लेखनीय झालेली नाही. केकेआरचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नव्हता. श्रेयस अय्यरने आयपीएल २०२२ मध्ये एकूण १४ सामन्यांमध्ये ३०.८४च्या सरासरीने ४०१ धावा जमवल्या होत्या. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.