श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

श्रेयस अय्यरने स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचा (SJAM) 'इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 01:50 PM2023-08-15T13:50:09+5:302023-08-15T13:50:46+5:30

whatsapp join usJoin us
  Shreyas Iyer gets SJAM international cricketer of the year award and India batter Jemima Rodrigues won the 'Women's Cricketer of the Year' award  | श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरने स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचा (SJAM) 'इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे. खरं तर अय्यर सध्या दुखातपीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण, १ जानेवारी २०२२ ते ३१ मे २०२३ पर्यंत पुरस्कारांसाठी विचारात घेतलेल्या कालावधीत अय्यरने बाजी मारली. या कालावधीत भारतीय खेळाडूने ८ कसोटी सामने खेळले असून ४६४ धावा केल्या आहेत, तर २० वन डे सामन्यांमध्ये ८१८ धावा आणि १७ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ४६३ धावा करण्यात अय्यरला यश आले.

आपल्या फलंदाजीच्या अनोख्या शैलीने चाहत्यांच्या मनात जागा करणाऱ्या सूर्याने इथेही मनं जिंकली. सूर्यकुमार यादवने 'आयपीएलमधील मुंबई क्रिकेटर' हा पुरस्कार पटकावला आहे. तसेच भारतीय महिला संघाची आघाडीची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने 'वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू'चा (Women's Cricketer of the Year) पुरस्कार जिंकला. याशिवाय सर्फराज खान आणि शम्स मुलानी यांनी 'रणजी ट्रॉफी क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्कारावर आपले नाव कोरले. तसेच रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि टेबल टेनिसपटू दिया पराग चितळे या दोन्ही युवा शिलेदारांना 'स्पोर्ट्समन ऑफ द इयर' आणि 'स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
रुद्रांक्ष पाटील - वर्षातील सर्वोत्तम खेळाडू  
मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने फेब्रुवारी २०२३ मध्ये कैरो येथे झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सुवर्णपदक आणि १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक सुवर्णपदक जिंकले. लक्षणीय बाब म्हणजे रूद्रांक्षने पॅरिस २०२४ मध्ये उन्हाळी ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी १० मीटर एअर रायफलमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. २० वर्षीय दिया चितळे देखील वर्षातील 'सर्वोत्तम' खेळाडू ठरली आहे. तिने २०२२ मध्ये लिमा पेरू येथे WTT युवा स्पर्धकांच्या अंडर-१९ मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक जिंकले, अंतिम फेरीत कोलंबियाच्या जुहाना लोझादाचा ३-० असा पराभव केला.
 
भारतीय खेळ : (वर्षातील सर्वोत्तम खेळाडू) - संदिप डायव्ह (कॅरम)
संदीपने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये मलेशियातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे पुरुष एकेरी आणि सांघिक विजेतेपद जिंकले होते. 

ज्युनिअर स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर - आदित्य मित्तल (बुद्धिबळ)
वयाच्या सतराव्या वर्षी आदित्य मुंबईचा दुसरा ग्रँडमास्टर बनला आहे. 
 
ज्युनियर स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर - अपेक्षा फर्नांडिस
मुंबईची लेक अपेक्षा फर्नांडिस ही पेरू येथील लिमा येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनियर स्विमिंग चॅम्पियनशिप २०२२ च्या अंतिम २०० मीटर बटरफ्लायसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय जलतरणपटू ठरली. तिने नॅशनल ज्युनियर अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिप २०२२ मध्ये पाच विक्रम मोडले. १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, १०० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मेडल आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक. याशिवाय अपेक्षाने २०२२ मध्ये हरयाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पाच सुवर्ण पदके आणि एक रौप्य तसेच मध्य प्रदेशातील २०२३च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहा सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले.

वर्षातील सर्वोत्तम संघ - मुंबई सिटी एफसी
इंडियन सुपर लीगमध्ये अव्वल स्थानी राहिलेल्या मुंबई सिटी एफसी संघाने २०२३ मध्ये लीग शिल्ड जिंकली.

स्पेशल Recognition अवॉर्ड -
हरयाणामधील २०२२ खेलो इंडिया युथ गेम्समध्ये उपविजेते आणि मध्य प्रदेशातील २०२३ च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाला स्पेशल Recognition अवॉर्ड जाहीर झाला आहे. 

दरम्यान, सूर्यकुमार यादवने 'आयपीएलमधील मुंबई क्रिकेटर' हा पुरस्कार पटकावला आहे. सूर्याने आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनुक्रमे ३०३ आणि ६०५ धावा केल्या आहेत. तर, रणजी ट्रॉफी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सर्फराज खान आणि शम्स मुलानी यांनी पटकावला. सर्फराजने २०२१-२२ मध्ये ६ सामन्यांत ९८२ धावा, २०२२-२३ मध्ये ५५६ धावा आणि शम्स मुलानीने २०२१-२२ मध्ये सहा सामन्यांत ३२१ धावा आणि ४५ बळी तसेच २०२२-२३ मध्ये सात सामन्यांत २०९ धावा अन् ४६ बळी घेतले आहेत.

Web Title:   Shreyas Iyer gets SJAM international cricketer of the year award and India batter Jemima Rodrigues won the 'Women's Cricketer of the Year' award 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.