Join us  

श्रेयस अय्यरने घेतली आयसीसी क्रमवारीत २७ स्थानांची मोठी झेप

श्रेयस अय्यरने आयसीसी टी-२० क्रमवारीत तब्बल २७ स्थानांची मोठी  झेप घेत १८ वे स्थान गाठले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 9:29 AM

Open in App

दुबई :श्रेयस अय्यरनेआयसीसी टी-२० क्रमवारीत तब्बल २७ स्थानांची मोठी  झेप घेत १८ वे स्थान गाठले. विराट कोहली हा मात्र अव्वल दहा खेळाडूंमधून बाहेर पडला. श्रीलंकेविरुद्ध स्थानिक मालिकेत मिळालेल्या विजयामुळे भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत मोठे बदल झाले. 

श्रेयसने तीन सामन्यांच्या मालिकेत तीनही सामन्यात अर्धशतके ठोकली होती. २७ वर्षांच्या या फलंदाजाने  १७४ च्या स्ट्राईकने तीन सामन्यात नाबाद २०४ धावा केल्या. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार तीन स्थानांची झेप घेत १७ व्या स्थानावर दाखल झाला. श्रीलंकेचा पाथूम निसांका हा नवव्या स्थानावर आला.  कोहली मात्र दहावरून १५ व्या स्थानी घसरला. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती.

फलंदाज 

१. बाबर आझम (पाकिस्तान) : ८०५२. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) : ७९८३. एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका) : ७९६४. डेव्हिड मलान (इंग्लंड) : ७२८५. डीवोन कॉन्वे (न्यूझीलंड) : ७०३

गोलंदाज

१. तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका) : ७८४२. जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) : ७५२३. आदिल राशिद (इंग्लंड) : ७४६४. ॲडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) : ७१९५. राशिद खान (अफगाणिस्तान) : ७१०

अष्टपैलू 

१. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) : २६५२. शाकिब अल हसन (बांगलादेश) : २३१३. मोईन अली (इंग्लंड) : २०५४. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) : १७३५. लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) : १७१

टॅग्स :आयसीसीश्रेयस अय्यर
Open in App