Join us

सूर्याच्या पदरी भोपळा! दुसऱ्या सेंंच्युरीसह श्रेयस अय्यरनं ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

कॅप्टन्सीला साजेसा खेळ करत झळकावले दमदार शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:46 IST

Open in App

Shreyas Iyer's Century After Suryakumar Yadav Golden Duck In Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने धमाकेदार शतकी खेळी साजरी केली. एका बाजूला सूर्यकुमार यादव याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली असताना दुसऱ्या बाजूनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत श्रेयस अय्यरच्या भात्यातून आलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईच्या संघाने पुदुच्चेरी विरुद्धच्या सामन्यात निर्धारित ५० षटकात २९० धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना पदुच्चेरी संघ २७.२ षटकात १२७ धावांवर आटोपला. मुंबईच्या संघानं हा सामना तब्बल १६३ धावांनी जिंकला. 

मुंबईकर सलामीवीरासह सूर्याच्या पदरी पहिल्याच चेंडूवर पदरी पडला भोपळा

पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अंगकृष्ण रघुवंशी पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. आयुष म्हात्रे हा देखील ६ चेंडूचा सामना करून तंबूत परतला. ठराविक अंतराने विकेट्सचा सिलसिला कायम होता. सलामीवीराशिवाय सूर्यकुमारच्या पदरीही भोपळा पडला. तोही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण दुसर्या बाजुनं कॅप्टन मैदानात तग धरून १३३ चेंडूत १६ चकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची खेळी करत आव्हानात्म धावंस्ख्या उभी केली. 

श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, स्पर्धेतील दुसऱ्या सेंच्युरीसह ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दावेदारी

श्रेयस अय्यरचं विजय हजारे वनडे स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. त्याने या शतकी खेळीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपली दावेदारी भक्कम केलीये.  याआधी कर्नाटक विरुद्धच्या स्पर्धेत सलामीच्या लढतीत अय्यरच्या भात्यातून ११४ धावांची खेळी आली होती.  याशिवाय हैदराबादविरुद्धही त्याने ४४ धावांची लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती.

मुंबईनं एकतर्फी जिंकला सामना

 श्रेयस अय्यरनं केलेल्या १३७ धावांशिवाय  अथर्व अंकोलेकर याने ४७ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने ४३ धावांच योगदान दिले. हार्दिक तमोर (११), सुर्यांश शेडगे (१०) आणि शार्दुल ठाकूर यांनी (१६) दुहेरी आकडा पार केला. त्यामुळे मुंबईच्या संघाने निर्धारित ५० षटकात ९ बाद २९० धावा केल्या. हे आव्हान पदुच्चेरी संघाला झेपलं नाही. मुंबईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, सूर्यांश शेडगेसह आयुष्ट म्हात्रेनं प्रत्येकी दोन दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. यांच्याशिवाय विनायक भोईर, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना यांनी प्रत्येकी एक एक विकेट्स मिळवत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.   

टॅग्स :विजय हजारे करंडकश्रेयस अय्यरसूर्यकुमार अशोक यादव