Shreyas Iyer Get Chance Team India Squad For Champions Trophy : नव्या वर्षात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीतील पराभवासह आयसीसीची ट्रॉफी उंचावण्याची संधी हुकली. कसोटीतील 'गम' विसरून टीम इंडिया आता वनडेतील आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीला लागलीये. मिनी वर्ल्ड कप स्पर्धा म्हणून ओळखली जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ कसा असेल? कोण संघात टिकून राहिल? कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला कमबॅकची संधी मिळणार याची चर्चा जोर धरू लागलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्याला इंग्लंड विरुद्ध संधी तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही दिसणार
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत ज्याला संधी मिळेल, तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाचा भाग असणार हे जवळपास निश्चित आहे. आगामी मिनी वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी झाली असून त्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जाते.
टीम इंडियातून बाहेर काढलेल्या पठ्ठ्या कमबॅकची
टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात आघाडीवर नाव आहे ते आयपीएल चॅम्पियन कॅप्टनच. हा तोच चेहरा आहे ज्याला फक्त टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला नव्हता तर बीसीसीआयच्या वार्षिक करारातूनही त्याचा पत्ता कट झाला होता. तो भारतीय खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर. टीम इंडियातून बाहेर पडल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कंबर कसून केलेल्या मेहनतीच फळं त्याला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतच मिळणार आहे, अशी चर्चा आहे. एक नजर टाकुयात त्याची दावेदारी भक्कम करण्यासाठी त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीवर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जलवा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. १२ जानेवारीपर्यंत या स्पर्धेसाठी संघ ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील स्टार खेळाडू असलेल्या श्रेयस अय्यरनं ५ वेगवेगळ्या देशांतर्गत स्पर्धेत आपला जलवा दाखवून देत १३४१ धावा कुटल्या आहेत. या कामगिरीसह त्याने टीम इंडियातील कमबॅकची आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच कमबॅक पक्क मानले जात आहे. याचाच अर्थ तो पुन्हा येईल हे गाणं या क्रिकेटरसाठी वाजू लागलं आहे.
शतकासह द्विशतकी खेळीनंही वेधलं लक्ष
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यरनं ५ सामन्यातील ५ डावात दोन शतकांसह ३२५ धावा ठोकल्या आहेत. यात १३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. देशांतर्गत वनडे स्पर्धेतील ही कामगिरी त्याला पुन्हा टीम इंडियात एन्ट्रीची नामी संधी निर्माण करून देणारी आहे. याशिवाय रणजी ट्रॉफीसह अन्य ४ देशांतर्गत स्पर्धेत त्याने शतकासह द्विशतकी खेळी करून छाप सोडली आहे.