इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या मिनी-लिलावात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) च्या नावाचा समावेश झाल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. २० लाखांच्या बेस प्राईज असलेल्या खेळाडूंमध्ये अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत त्यानं मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केलं आणि तो आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवण्यासाठी पात्र ठरला. आता त्याला कोणता संघ आपल्या ताफ्यात घेतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. १८ फेब्रुवारीला चेन्नईत हा लिलाव पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी बुधवारी विजय हजारे ट्रॉफीसाठी ( Vijay Hazare Trophy squad) मुंबईच्या संघाची निवड झाली आणि त्यात अर्जुनचं नाव दिसत नाही. बाहेर कोण जाईल माहीत नाही, पण 'हा' खेळाडू नक्की खेळेल; सुनील गावस्करांचा दावा
विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईत पार पडलेल्या सराव सामन्यात अर्जुनला चांगली कामगिरी करता आली नाही. एका सराव सामन्यात अर्जुनला खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्यानं ४.१ षटकांत ५३ धावा दिल्या आणि एकही विकेट घेता आली नाही. त्याला फलंदाजीत फक्त एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली. ३११ धावांचा डोंगर उभारूनही टीम ए संघाला टीम सीकडून हार मानावी लागली. त्यांनी ३५.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. यशस्वी जैस्वालनं ९७ चेंडूंत १४२ धावा चोपल्या. पृथ्वी शॉ यानेही ३५ धावा केल्या, तर सर्फराज खाननं २३ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. ... तर विराट कोहलीनंही ठोकल्या असत्या २५० धावा; कर्णधाराच्या बचावासाठी माजी खेळाडूची बॅटिंग
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही अर्जुनला दोन सामन्यांत चार विकेट्स घेता आल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला २० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून १४ मार्चला अंतिम सामना आहे. पराभवानंतर विराट कोहलीनं 'चेंडू'बाबत व्यक्त केली नाराजी; याच चेंडूनं इंग्लंडनं उडवली टीम इंडियाची झोप
मुंबईचा संघ - श्रेयस अय्यर ( कर्णधार), पृथ्वी शॉ ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, अखिल हेरवाडकर, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, शिबम दुबे, आकाश पारकर, आतीफ अत्तरवाला, शॅम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजित नायक, तनूष कोटीयान, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहित अवस्थी
मुंबई संघाचे सामने Mumbai Team Vijay Hazare Trophy 2020-21 Schedule: (Venue: Jaipur & Group ‘Elite D’)वि. दिल्ली, २१ फेब्रुवारीवि. महाराष्ट्र, २३ फेब्रुवारीवि. पुद्दुचेरी, २५ फेब्रुवारीवि. राजस्थान, २७ फेब्रुवारी वि. हिमाचल प्रदेश, १ मार्च