मुंबई : मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. त्याने सय्यद मुश्ताक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी अफलातून खेळी साकारताना रिषभ पंत, सुरेश रैना आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. त्यानं सिक्कीम संघाविरुद्धच्या सामन्यात 55 चेंडूंत 147 धावा चोपून काढल्या. ट्वेंटी- क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम श्रेयसने आपल्या नावावर नोंदवला. याशिवाय त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली, परंतु मुंबई संघाला एका विक्रमाने अवघ्या 6 धावांनी हुलकावणी दिली.
अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ यांना मुंबईला चांगली सुरुवात करून देता आली नाही. हे दोघेही फलकावर 22 धावा असताना माघारी परतले. मात्र, श्रेयस आणि सूर्यकुमार यादव यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 33 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 63 धावा चोपल्या. श्रेयसने 55 चेंडूंत 7 चौकार व तब्बल 15 षटकार खेचून 147 धावा कुटल्या. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 4 बाद 258 धावांचे डोंगर उभे केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपणाऱ्या भारतीय संघात मुंबईने दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 263 धावांसह आघाडीवर आहे. बंगळुरूनं 2013 मध्ये वॉरियर्सविरुद्ध 5 बाद 263 धावा चोपल्या होत्या.
श्रेयसने आपल्या खेळीत 15 षटकार खेचले आणि एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले. हा विक्रम
रिषभ पंतच्या नावावर होता. त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना 2018 मध्ये हिमाचल प्रदेश संघाविरुद्ध 116 धावांच्या खेळीत 12 षटकार खेचले होते. श्रेयसने या खेळीसह ट्वेंटी-20त सर्वोत्तम खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रमही नावावर केला. पंतने ( दिल्ली डेअरडेव्हिल्स) 2018 मध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध नाबाद 128 धावांची खेळी केली होती. यापाठोपाठ
सुरेश रैना ( उत्तर प्रदेश ) नाबाद 126 ( वि. बंगाल), वीरेंद्र सेहवाग ( किंग्ज इलेव्हन पंजाब ) 122 ( वि. चेन्नई सुपर किंग्स ) आणि सेहवाग ( वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स) 199 ( वि. डेक्कन चार्जर) यांचा क्रमांक येतो.
Web Title: Shreyas Iyer's 55-ball 147 also broke Rishabh Pant's 128* as the highest T20 score by an Indian
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.